Home उद्योग अदानी पॉवरकडून 600 मेगावॅट क्षमतेच्या विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण

अदानी पॉवरकडून 600 मेगावॅट क्षमतेच्या विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण

22 second read
0
0
35

no images were found

अदानी पॉवरकडून 600 मेगावॅट क्षमतेच्या विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण

·         अदानी पॉवरची कार्यरत उत्पादन क्षमता आता 18,150 मेगावॅटपर्यंत पोहोचली

·          कंपनी 2029–30 पर्यंत 30,670 मेगावॉट क्षमतेचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर

·          व्हीआयपीएल हा नागपूर, महाराष्ट्रातील 2×300 मेगावॉट क्षमतेचा कार्यरत थर्मल पॉवर प्रकल्प आहे

अहमदाबाद,: भारतातील सर्वात मोठी खाजगी थर्मल पॉवर उत्पादक कंपनी असलेल्या अदानी पॉवर लिमिटेड (एपीएल) ने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) या कंपनीच्या खरेदी व रिझोल्यूशन प्लॅनची अंमलबजावणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही डील एकूण 4,000 कोटी रुपयांच्या व्यवहारात पार पडली आहे. व्हीआयपीएल हा नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे असलेला 2×300 मेगावॉट क्षमतेचा देशांतर्गत कोळशावर चालणारा थर्मल वीज प्रकल्प आहे.

       व्हीआयपीएल सध्या इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड (आयबीसी) अंतर्गत कॉर्पोरेट इनसॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रक्रियेतील (सीआयआरपी) होती. 18 जून 2025 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने अदानी पॉवरच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली. त्यानंतर, 7 जुलै 2025 रोजी या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.

         या अधिग्रहणामुळे अदानी पॉवर लिमिटेडची कार्यरत वीज निर्मिती क्षमता 18,150 मेगावॉटवर पोहोचली आहे. अदानी पॉवर सध्या ब्राऊनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांद्वारे आपल्या बेस लोड वीज निर्मिती पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. कंपनी सध्या मध्यप्रदेशातील सिंगरौली-महान, छत्तीसगडमधील रायपूर, रायगड आणि कोरबा तसेच राजस्थानमधील कवई येथे प्रत्येकी 1,600 मेगावॉट क्षमतेचे सहा ब्राऊनफिल्ड अल्ट्रा-सुपरक्रिटिकल पॉवर प्रोजेक्ट्स उभारत आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे 1,600 मेगावॉट क्षमतेचा ग्रीनफिल्ड प्रकल्पही उभारण्यात येत आहे. याखेरीज, कंपनीने यापूर्वी अधिग्रहित केलेल्या कोरबा येथील 1,320 मेगावॉट क्षमतेच्या सुपरक्रिटिकल प्रकल्पाचे बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. या सर्व प्रकल्पांद्वारे एपीएल भारतातील सर्वात मोठी खाजगी बेस लोड वीज निर्मिती करणारी कंपनी म्हणून 2030 पर्यंत 30,670 मेगावॉट कार्यक्षमतेचा टप्पा गाठेल.

“व्हीआयपीएलचे अधिग्रहण हे अडचणीत आलेल्या मालमत्तांचे पुनरुज्जीवन करून त्यातून मूल्य मिळविण्याच्या अदानी पॉवरच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत असताना आम्ही ‘सर्वांसाठी वीज’ या भारत सरकारच्या ध्येयासाठी कटिबद्ध आहोत. देशाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आम्ही विश्वासार्ह, परवडणारी आणि सातत्यपूर्ण वीज उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सुरू ठेवू,” असे अदानी पॉवर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. ख्यालिया यांनी सांगितले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…