no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने ‘अर्बन क्रूझर हायरायडर’साठी खास ‘प्रेस्टीज पॅकेज’ सादर केले
बेंगळुरू,: ग्राहकांचा आनंद वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने त्यांच्या लोकप्रिय सेल्फ-चार्जिंग हायब्रीड एसयूव्ही – अर्बन क्रूझर हायरायडरसाठी एक मर्यादित कालावधीसाठी ‘प्रेस्टीज पॅकेज’ सादर केले आहे. एसयूव्हीचे डिझाईन अधिक बोल्ड आणि आकर्षक बनवण्यासाठी हे अॅक्सेसरी पॅकेज तयार करण्यात आले असून, यामुळे रोजच्या ड्रायव्हिंगसाठी स्टाईल, उपस्थिती आणि कार्यक्षमतेत भर पडेल.
जुलै 2025 पासून उपलब्ध असलेले प्रेस्टीज पॅकेज, हायरायडरच्या आकर्षक आणि आधुनिक डिझाइनला पूरक ठरणारी 10 उच्च-मूल्याची, अधिकृत डीलरकडून बसवण्यात येणारी आणि दर्जेदार अॅक्सेसरीजचा समावेश करते:
1. डोअर व्हिझर– प्रीमियम (एसएस इन्सर्टसह)
2. हूड एम्ब्लेम
3. रिअर डोअर लिड गार्निश
4. फेंडर गार्निश
5. बॉडी क्लॅडिंग
6. फ्रंट बंपर गार्निश
7. हेडलॅम्प गार्निश
8. रिअर बंपर गार्निश
9. रिअर लॅम्प गार्निश – क्रोम
10. बॅक डोअर गार्निश
प्रत्येक अॅक्सेसरीची निवड अर्बन क्रूझर हायरायडरच्या वेगळ्या आणि बोल्ड एसयूव्ही लूकशी सुसंगत राहील यासाठी काळजीपूर्वक करण्यात आली आहे. या अॅक्सेसरीजमुळे वाहनाचा दमदार आकार, क्रोम फिनिशिंग आणि आकर्षक रूपरेषा अधिक उठून दिसते, तसेच अतिरिक्त संरक्षण आणि टिकाऊपणा देखील देते.
बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवा मापदंड
अर्बन क्रूझर हायरायडर हे या सेगमेंटमधील पहिलेच एसयूव्ही आहे, ज्यामध्ये सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आहे, जे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरचा स्मार्ट वापर करून उत्कृष्ट मायलेजबरोबर शांत आणि स्मूथ परफॉर्मन्स देते. टोयोटाचा 1.5 लिटर टीएनजीए अॅटकिंसन सायकल इंजिन आणि अॅडव्हान्स इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालणाऱ्या हायब्रीड व्हेरियंटसोबत, शहरात किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही हे उपयुक्त आहे. निओ ड्राईव्ह (माइल्ड-हायब्रीड) व्हेरियंटमध्ये 1.5 लिटर के-सिरीज इंजिन असून – 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. अधिक क्षमतेसाठी, काही ट्रिम्समध्ये इंटेलिजंट ऑल-व्हील ड्राईव्ह (एडब्ल्यूडी) सिस्टिम देखील देण्यात आली आहे, जी हायरायडरला कार्यक्षमतेसोबतच अधिक बहुपर्यायी बनवते.
डिझाईन आणि वैशिष्ट्ये
टोयोटाच्या जागतिक एसयूव्ही डीएनएचे प्रतीक असलेल्या हायरायडरमध्ये आकर्षक क्रिस्टल अॅक्रिलिक ग्रिल, ट्विन एलईडी डीआरएल, शार्प कॅरेक्टर लाईन्स आणि 17-इंच अलॉय व्हील्सचा समावेश आहे. इंटिरियरमध्ये, या एसयूव्ही मध्ये आरामदायक आणि सुविधाजनक अनुभवासाठी व्हेंटिलेटेड लेदर सीट्स, पॅनोरामिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन (वायरलेस अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो), वायरलेस चार्जिंग, अॅम्बियंट लायटिंग आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. वास्तविक गरजा लक्षात घेऊन रिअर रीक्लायनिंग सीट्स, रिअर एसी वेंट्स, यूएसबी पोर्ट्स आणि 60:40 स्प्लिट रिअर सीट्ससारख्या सोयी उपलब्ध आहेत, जे आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी हायरायडरला योग्य पर्याय बनवतात.
संपूर्ण मालकीचा अनुभव अधिक प्रीमियम आणि समृद्ध करण्यासाठी टोयोटा 66 एक्सक्लुझिव्ह अॅक्सेसरीज, 3 वर्षे/1,00,000 किमी वॉरंटी (5 वर्षे/2,20,000 किमी पर्यंत विस्तारता येणारी) आणि 8 वर्षे/1,60,000 किमी हायब्रीड बॅटरी वॉरंटी अशा सेवा देऊन ग्राहकांचा प्रीमियम आणि त्रासमुक्त ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित सुलभ करतात.
2022 मध्ये बाजारात आलेल्या अर्बन क्रूझर हायरायडरने एसयूव्ही खरेदीदारांमध्ये अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून अलीकडेच 100000 युनिट विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ही कामगिरी टोयोटाच्या हायब्रीड तंत्रज्ञानावरील वाढत्या विश्वास आणि टिकाऊ मोबिलिटीबाबतच्या कंपनीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. दमदार डिझाइन, प्रशस्त इंटिरियर आणि सिद्ध विश्वासार्हता यामुळे हायरायडर आजही ग्राहकांना एक परिपूर्ण आणि समाधानकारक मालकीचा अनुभव देत आहे.
टोयोटा ग्राहकांना त्यांच्या जवळच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊन प्रेस्टीज पॅकेजची माहिती घेण्याचे तसेच टोयोटा हायब्रीड एसयूव्ही चालवण्याचा वाढीव मूल्य आणि आत्मविश्वासाचा अनुभव घेण्याचे आमंत्रण देते.