Home उद्योग टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला भारत एनसीएपी अंतर्गत 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला भारत एनसीएपी अंतर्गत 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त

36 second read
0
0
37

no images were found

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला भारत एनसीएपी अंतर्गत 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त

·         प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रतिष्ठित 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त
·         टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (टीएनजीए) प्लॅटफॉर्मवर आधारित आणि टोयोटा सेफ्टी सेन्स (टीएसएस) सुविधांनी सुसज्ज या व्हेईकल मध्ये ड्रायव्हर्स, प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहे

बंगळुरू,: सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता वाहननिर्मिती करण्याच्या टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) च्या वचनबद्धतेचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून, लोकप्रिय इनोव्हा हायक्रॉसला भारतातील सर्वसमावेशक वाहन सुरक्षा मूल्यांकन प्रणाली – भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) अंतर्गत 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त झाले आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवासाच्या सुविधा देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण आणि मूलभूत दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.

प्रौढ आणि बाल प्रवाशांच्या संरक्षणासाठी हायक्रॉसला 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त झाले आहे.

आज सकाळी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र श्री. विक्रम गुलाटी (कंट्री हेड आणि ईव्हीपी – कॉर्पोरेट अफेयर्स आणि गव्हर्नन्स) आणि श्री. सुदीप दळवी (सीसीओ, एसव्हीपी आणि हेड स्टेट अफेयर्स) यांना देण्यात आले.

सुरक्षिततेच्या उद्देशाने डिझाइन केलेली इनोव्हा हायक्रॉस

टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली इनोव्हा हायक्रॉस ही गाडी अपघातातील सुरक्षा आणि संरचनात्मक मजबुती सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. यासोबत हायक्रॉसमध्ये अनेक प्रगत सक्रिय व निष्क्रीय सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ती उद्योगातील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक ठरते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

·         टोयोटा सेफ्टी सेन्स (टीएसएस) – प्री-कोलिजन सिस्टम, लेन ट्रेस असिस्ट, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि ऑटोमॅटिक हाय बीम असलेले ड्रायव्हर असिस्टन्स सूट

·         सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्स जे ऑल-अराउंड ऑक्युपंट प्रोटेक्शन देतात

·         व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (व्हीएससी) आणि ट्रॅक्शन कंट्रोल (टीआरसी)

·         इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस)

·         हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक

·         टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस)

·         मुलांच्या सुरक्षिततेसाठी आईएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स

या महत्त्वपूर्ण टप्प्याविषयी बोलताना श्री. वरिंदर वाधवा, वाइस प्रेसिडेंट – सेल्स-सर्व्हिस-युज्ड कार बिझनेस, टोयोटा किर्लोस्कर मोटर म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये सुरक्षितता ही आमच्या विकास, उत्पादन प्रक्रिया आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोनाची मूलभूत आधारशिला आहे. इनोव्हा हायक्रॉस ही आमच्या या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, जी असा प्रवास अनुभव देते जिथे गाडीची मालकी आणि वापराचा अनुभव कार्यक्षमता आणि आराम यांच्याइतकाच महत्त्वाचा मानला जातो. भारत एनसीएपी कडून मिळालेले 5-स्टार रेटिंग ही आमच्या या तत्वज्ञानाची ओळख आहे, कारण हे आमच्या ग्राहकांना या गोष्टीची खात्री देते की ते केवळ प्रगत आणि शाश्वत मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करत नाहीत, तर सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एकाची निवड करत आहेत.”

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करत, आम्ही प्रगत सुरक्षा सुविधांना अधिक सुलभ बनवण्यासाठी नेहमीच उंची गाठत राहू, ज्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासात अग्रगण्य असलेल्या टोयोटा ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ होईल.

सर्वाधिक पसंतीची  कौटुंबिक कार आता सुरक्षा निकष ठरवते

नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच झालेल्या इनोव्हा हायक्रॉसने अल्पावधीतच आपल्या सेगमेंटमध्ये एक मानदंड निर्माण केला असून, तिने देशभरातील भारतीय कुटुंबांचा विश्वास मिळवला आहे. एसयूव्ही-प्रेरित दमदार डिझाइन, शक्तिशाली सेल्फ-चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी आणि प्रशस्त, प्रीमियम इंटिरिअर्सच्या साहाय्याने, हायक्रॉसने या सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या अपेक्षांना नवी दिशा दिली आहे. तिच्या वाढत्या लोकप्रियतेचा पुरावा म्हणजे नुकतेच तिने भारतात 1,35,000 युनिट्स विकल्याचा उल्लेखनीय टप्पा पार केला आहे, जी तिच्या मजबूत बाजारपेठेतील स्वीकृती आणि ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. टोयोटाच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता (क्यूडीआर) या तत्वांना प्रगत वैशिष्ट्ये आणि नवोपक्रमांसोबत एकत्रित करून, हायक्रॉस ही टोयोटाच्या भारतातील शाश्वत मोबिलिटीसाठी असलेल्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाची एक प्रमुख ओळख ठरते.

टीकेएमचा दृष्टीकोन

भारत सुरक्षित, शाश्वत व आत्मनिर्भर भविष्याकडे वाटचाल करत असताना, टोयोटा किर्लोस्कर मोटर आपली जबाबदारी मानून या दृष्टीकोनासोबत पूर्णतः सुसंगत आहे. भारत एनसीएपी अंतर्गत मिळालेली मान्यता हे एक अभिमानास्पद टप्पा असून टीकेएमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायीही आहे, कारण टीकेएम अशी वाहने विकसित करत आहे जी केवळ रस्त्यावरच नव्हे, तर त्याही पलीकडे खऱ्या अर्थाने मूल्य प्रदान करतात.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…