no images were found
जागतिक चॉकलेट दिन: : सोनी सबवरील कलाकार सांगत आहेत आपल्या चिरंतन चॉकलेट प्रेमाविषयी
चॉकलेटच्या बाबतीत नक्कीच काहीतरी खास असते. चॉकलेट आपल्याला स्वादाचा आनंद देतात, जुन्या आठवणींत घेऊन जातात आणि जीवनातील काही सुंदर क्षण देऊन जातात. अनेकांना चॉकलेट हा मूड सुधारण्याचा रामबाण उपाय वाटतो. जगात सर्वत्र जागतिक चॉकलेट दिन साजरा होत असताना सोनी सबवरील कलाकार, आशी सिंह, करुणा पांडे, सायली साळुंखे, आदित्य रेडिज आणि परिवा प्रणती आपल्या चॉकलेट्सशी निगडीत गोड आठवणी शेअर करत आहेत-
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीची भूमिका करत असलेली आशी सिंह म्हणते, “मला वाटते चॉकलेट ही माझी कायमची कमजोरी आहे. लहान असताना खास करून रात्रीच्या वेळी फ्रिज धुंडाळून जे मिळेल ते चॉकलेट मी तोंडात टाकायचे. खरं सांगायचं तर, ती माझी सवय आजही फारशी बदललेली नाही. आजही छोट्या छोट्या चॉकलेटच्या पॅकमधून माझ्या आवडत्या रंगाच्या चॉकलेट निवडून, तोंडात चघळत चघळत त्या जुन्या दिवसांचा आनंद मी घेते. मला चॉकलेटचा एक एक थर खायला आवडते. मला चॉकलेटच्या सगळ्याच गोष्टी आवडतात. पण त्यातून सर्वाधिक आवडीची गोष्ट निवडायची झाली, तर वॉर्म चॉकलेट लावा केक आणि सोबत व्हॅनिला आइस्क्रीम ही विरोधी जोडी मला फारच आवडते. दिवस खूप धकाधकीत गेला की चॉकलेट खाल्ल्यावर मन एकदम स्थिरावते. चॉकलेटच्या एका छोट्याशा तुकड्यामुळे माझ्यात नव ऊर्जेचा संचार होतो!”
‘वीर हनुमान’ मालिकेत अंजनी मातेची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “मी पहिल्यापासून गोडघाशी आहे. चॉकलेट ब्राऊनी हा तर माझा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ आहे. लहान असताना माझा परीक्षेत चांगला निकाल आला की आई मला नेहमी चॉकलेट मिल्कशेक देऊन माझे कौतुक करायची. आजही तीच परंपरा चालू आहे. आज मला स्वतःला खुश करायचे असले की मी जेवण झाल्यानंतर मस्त स्वादिष्ट चॉकलेट ब्राऊनी किंवा एक डार्क चॉकलेटचा बार खाते. त्या थोड्या कडू, थोड्या गोड चवीत नक्कीच काही तरी असते, ज्यामुळे तुम्हाला स्वर्गीय आनंद मिळतो. मी तर स्वतःसाठी ही परंपराच करून टाकली आहे – धकाधकीच्या दिवसात मध्येच कधीतरी एक छोटीशी ट्रीट!”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “माझ्यासाठी चॉकलेट म्हणजे आनंदाचे प्रतीक आहे. मला आठवते, जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझे वडील चॉकलेट्स घेऊन यायचे आणि सगळे नातेवाईक एकत्र व्हायचे तेव्हा त्या चॉकलेट्सचे रॅपर काढून त्या सगळ्यांमध्ये वाटायला मला फार आवडायचे. आजही जेव्हा मी चॉकलेट खाते, तेव्हा लहानपणीचे क्षण आठवतात. आता, जेव्हा जेव्हा मला जास्त वेळ काम करावे लागते किंवा रात्री उशिरापर्यंत तालमी चालू असतात, त्यावेळी, मी माझ्या बॅगेत एक डार्क चॉकलेटचा बार ठेवलेलाच असतो. तो आरोग्यप्रद असतो आणि मला ऊर्जाही देतो. मला गोड पदार्थ फारसे आवडत नाहीत, पण चॉकलेटची बातच काही और आहे!”
‘तेनाली रामा’ मालिकेत राजा कृष्णदेवरायाची भूमिका करणारा आदित्य रेडिज म्हणतो, “चॉकलेट मला शाळेतल्या साध्या दिवसांची आठवण करून देते. वर्गात वाढदिवसाच्या चॉकलेट वितरित व्हायच्या, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. ते छोटेसे चॉकलेट आम्ही किती जपून ठेवायचो, आणि त्याचा काय आस्वाद घ्यायचो! आज माझ्या आवडीनिवडी थोड्या बदलल्या आहेत. आता मला डार्क चॉकलेटचा रिचनेस आवडतो. खास करून ज्यात समुद्री मीठ किंवा बदाम असतात, ते डार्क चॉकलेट मला फारच आवडते. चॉकलेट मूस आणि चॉकलेट देखील माझे आवडते पदार्थ आहेत. मला वाटते प्रत्यकाकडे स्वतःची अशी चॉकलेटची गोष्ट असते! माझ्या गोष्टीत जुन्या आठवणी आणि निखळ आनंद आहे. आख्खा दिवस शूटिंग करून दमल्यानंतर चॉकलेट खाऊन श्रम परिहार करण्यातला आनंद काही वेगळाच आहे.”
‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “एक आई म्हणून मला चॉकलेट वेगळ्याच कारणाने आवडतात. केवळ मला खायला आवडते इतकेच नाही, तर छोटे छोटे आनंद आणि एकत्र निर्माण केलेल्या आठवणी यांचे स्मरण देतात चॉकलेट्स! माझा मुलगा खूप लहान आहे आणि तो काय खातो याकडे माझे बारीक लक्ष असते. पण जेव्हा तो एखाद्या बेकरीच्या दुकानावरून जातो किंवा एखाद्या चॉकलेट केकवर त्याची नजर पडते तेव्हा त्याच्या डोळ्यांत जी चमक दिसते ती मी स्वतः नीट ओळखते! अशा वेळी मी देखील माझ्या बालपणात पोहोचते. मला लहानपणी चॉकलेट एकलेयर्स फारच आवडायचे आणि आईने घरी बनवलेला चॉकलेट बिस्किट केकसुद्धा फार आवडायचा. माझ्यासाठी चॉकलेट फक्त स्वादासाठी खायचे नसते, तर चॉकलेट पिढ्यांना जोडते आणि आठवणी जाग्या करते, अगदी आपल्या गोड स्वभावाने!”