
no images were found
दिपावली सणाचे पार्श्वभुमीवर महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपूरी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरु राहणार
कोल्हापूर : दिपावली सणाच्या कालावधीमध्ये महाद्वार रोड, राजारामपूरी तसेच शहरातील काही मार्केटस् ठिकाणी दिपावली सणाचे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यावर्षी दिपावली सणाचे पार्श्वभूमीवर शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक या उत्सवाच्या कालावधीत सुरु रहाणार आहे. या कालावधीमध्ये हे संपुर्ण मुख्य रस्ते बंद करण्यात येणार नाहीत. या परिसरातील दुकानदार व्यवसायीक व फेरीवाले यांनी त्यांना महापालिकेने आखूण दिलेल्या पांढ-या रंगाच्या पट्टयाचे आत व्यवसाय करावा लागणार आहे. यासाठी या रस्त्यांवर महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दिपावली सण कालावधीमध्ये उपस्थित राहून सर्व फेरीवाले, दुकानदार व व्यवसाईक यांना नियमानुसार पट्टयाचे आत व्यवसाय करण्याचे नियोजन करतील. नवरात्र उत्सवाप्रमाणे शहरातील संपुर्ण रस्ते वाहतुकीस सुरु रहाणार असून सर्व दुकानदार व फेरीवाले यांनी त्यांना आखून दिलेल्या पट्ट्याच्या आत थांबून वहातुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन आपला व्यवसाय करण्याचा आहे. कोणीही व्यवसायीक रस्त्याचे मध्यभागी थांबणार नाही. जर कोणी फेरीवाले रस्तेच्या मध्यभागी व्यवसाय करताना आढळलेस त्या फेरीवाल्याचे साहित्य जप्तीची कारवाई केली जाईल याची सर्व व्यवसायीक, फेरीवाले यांनी नोंद घ्यावी असे अतिक्रमण विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.