
no images were found
दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार
15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे आवाहन
कोल्हापूर, : सामाजिक न्याय अंतर्गत दिव्यांग जन शक्तीकरण या विभागाकडून प्रत्येक वर्षी 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनिय काम करण्यासाठी पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार देण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विभागाच्या www.depwd.gov.in या संकेत स्थळावर व राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in या संकेत स्थळावर उपलब्य आहे. ज्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत व त्याची एक प्रत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावी, असे आहवान जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांनी केले आहे.