
no images were found
शिंपी समाजाच्या वधुवर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे:- नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांच्या पुढाकाराने रविवार दि. १८ मे २०२५ रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे आयोजित केलेला “शिंपी समाजातील सर्व पोटजातीचा राज्यस्तरीय ४ था वधू-वर पालक परिचय महामेळावा मोठ्या संख्येने यशस्वीरित्या संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरून तसेच परदेशातून अत्यंत समाधानकारक नोंदणी झाली असून जवळपास दोन हजार समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला “पहलगाम” (काश्मीर) येथे इस्लामिक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले गटृमा फरसाण चे मालक कै. कौस्तुभ गनबोटे तसेच कै. चंद्रकांत निरगुडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वधुवर भारतात प्रथमच ॲड. सतीश कांबळे यांच्या पुढाकाराने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ADR प्रक्रिया आणि त्याचे फायदे, विवाहपूर्व समुपदेशन आयोजन करून मा. जिल्हा न्यायाधीश यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील सेक्रेटरी – जिल्हा न्यायाधीश श्रीमती सोनल पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचे शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, मा. मुख्य विश्वस्त रामभाऊ मेटे, विश्वस्त वसंतराव खुर्द(पुणे), बापूसो बोत्रे(पुणे), ॲड. अनिल कोपर्डे(मिरज), दिलीप लंगडे (मसुर कराड), सुरेश कुमठेकर (कोल्हापूर), ॲड. ज्ञानेश्वर पाटसकर (पुणे), पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजीत माळवदे, जिल्हा अध्यक्ष विजय कालेकर, केशवराज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, कार्यालयीन सचिव दिगंबर क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. भास्करराव टोम्पे, मुख्य समन्वयक अनंत जंगजोड, आमदार हेमंत रासणे, मा. आमदार रवींद्र धंगेकर, मा. नगरसेवक विनोद वस्ते, उद्योजिका डॉ. सुनिता पाटसकर, उद्योजक एकनाथ सदावर्ते, दिलीपकुमार वायचळ, संतोष हाबडे, समीर कोपार्डे, मनोज मांढरे यांचेसह शिल्पकार विवेक खटावकर, मा. नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते, मा. नगरसेवक विशाल धनवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्तम सूत्रसंचालन करून प्रशांत सातपुते यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली तर आभार प्रदर्शन सुभाष मुळे यांनी केले.
वधु वर मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे शहर शाखेचे सर्व पदाधिकारी व महिला कार्यकारणीने परिश्रम घेतले. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता हे प्रमुख पाहुणे श्रीमती स्मिता वस्ते यानी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. याचं संपूर्ण श्रेय आपल्या पुणे शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी व महिला कार्यकारणीचं आहे. व यातून काही त्रुटी राहिल्या असल्यास ती संपूर्ण जबाबदारी आमची आहे याबद्दल मनःपूर्वक सर्वांची क्षमा मागतो.
“समाजाने समाजासाठी घेतलेला उपक्रम” असलेल्या या उपक्रमात एकसंघ, एक जीवाचे सहकारी असणा-या माझ्या सर्व सहका-याचं मनापासून आभार. अशीच एकजूट ठेवून संत नामदेव महाराज ६७५ वा संजीवनी समाधी सोहळा स्मरणीय असा साजरा करु या…..
पुन्हा एकदा संपूर्ण नामदेव समाजोन्नती परिषद व पुणे शहर शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी, देणगीदार, जाहीरातदार यांचे मनःपूर्वक आभार