Home क्राईम हातकणंगले येथे अडिच वर्षाच्या बालकाचा विक्रीचा प्रयत्न पाच जणांना जेरबंद तर एक आरोपी फरार

हातकणंगले येथे अडिच वर्षाच्या बालकाचा विक्रीचा प्रयत्न पाच जणांना जेरबंद तर एक आरोपी फरार

0 second read
0
0
129

no images were found

हातकणंगले येथे अडिच वर्षाच्या बालकाचा विक्रीचा प्रयत्न पाच जणांना  जेरबंद तर एक आरोपी फरार

कोल्हापूर/प्रतिनिधी : हातकणंगले बसस्थानक परिसरात अडिच वर्षाच्या बाळाचा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना हातकणंगले पोलिसांनी सापळा रचून पकडले तर यातील एक जण फरार झाला . पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , हातकणंगले येथील बसस्थानकात अडिच वर्षाच्या बालकाच्या विक्रीसाठी काहि लोक येणार असल्याची गोपनिय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संतोष पुरी शिवपुरी गोस्वामी (वय ४०वर्ष )राहणार बेकाराई तालुका सारडा जिल्हा भीलवाडा राज्य राजस्थान, दिनेश नंदलाल बनभैरू (वय ३६ )राहणार लाडा प्लॉट अकोला नाका वाशिम जिल्हा वाशिम, कुसुमबाई देविदास गायकवाड (वय ४० )राहणार राहुल नगर नांदेड ,लक्ष्मी आदेश खरे (वय ४o )तेरा नगर नांदेड ,ललिता भिसे राहणार कोरोची तालुका हातकणंगले यांना त्यांच्या ताब्यातील लहान बाळासह ताब्यात घेण्यात आले असून संबंधित बाळास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत .
यातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आले आहेत यातील आणखीन एक आरोपी महेश चौधरी राहणार नांदेड हा पसार झाला आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत.तसेच यातील लहान बाळाबाबत कोणाला काहि माहिती असलेस त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…