Home क्राईम शोपियानमध्ये यूपीच्या दोन मजुरांची हत्या

शोपियानमध्ये यूपीच्या दोन मजुरांची हत्या

2 second read
0
0
122

no images were found

शोपियानमध्ये यूपीच्या दोन मजुरांची हत्या

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करून दोन गैर-काश्मीरी मजुरांची हत्या केली आहे. हत्या झालेले दोन्ही मजूर मनीष कुमार आणि रामसागर हे उत्तर प्रदेशातील कन्नौजचे रहिवासी आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास युनिटकडून पुलवामामध्ये छापे टाकण्यात येत आहेत. दोन्ही कामगार टिनच्या शेडमध्ये झोपलेले असताना त्यांचेवर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला केला. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी यापूर्वी काश्मिरी पंडित पूरन कृष्ण भट्ट यांची १५ ऑक्टोबरला गोळ्या घालून हत्या केली होती. भट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यानंतर आज २ मजुरांची हत्त्या करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…