
no images were found
एमसीए’सोबत सकारात्मक चर्चा—हेमंत पाटील
पुणे : राज्यासह देशाला उत्कृष्ट क्रिकेटपटू देण्याची महत्वाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) मधील भ्रष्टाचार तसेच अनागोंदी कारभाराविरोधातील लढा यशस्वी झाला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्यासोबत एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करीत सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. लवकरच मागण्याच्या पूर्तते संबंधी सकारात्मक पावले उचलली जातील, याची ग्वाही खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या बैठकीतून एमसीए पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पाटील यांनी शुक्रवारी (ता.२५) दिली. एमसीए कार्यालयात गुरूवारी संध्याकाळी असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ आणि अॅपेक्स कमिटीचे चेअरमन रणजीत खिरीड यांच्यासोबत दोन तास झालेल्या चर्चेनंतर सर्व मुद्द्यांवर तोडगा निघाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
असोसिएशनमधील भोंगळ कारभाराविरोधात वारंवार तक्रारी करून देखील योग्य कारवाई केली जात नसल्याची सबब देत २९ एप्रिल पासून एमसीएच्या कार्यालयासमोर पाटील आंदोलन करणार होते. गत सहा दशकांपासून राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क एमसीएकडून भरण्यात आलेला नाही.असोसिएशनने ही बाब गांर्भीयाने घेतली असून सखोल चौकशी करीत पुढील कारवाई केली जाईल,यासंदर्भात ग्वाही दिल्याचे पाटील म्हणाले. वशिलेबाजीचा कळस गाठलेल्या आणि आतापर्यंत अनेक प्रतिभावंत महिला क्रिकेटरचे नुकसान करणारी महिला निवड समिती बरखास्त करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली होती. ही समिती बरखास्त करण्यासंबंधी एमसीएने सकारात्मकता दाखवली आहे. यासोबतच एमसीए सोबत जुळलेले ६० पैकी केवळ २५ क्लबच नोंदणीकृत आहेत. अनोंदणीकृत क्लबचा संदर्भात तात्काळ पावले उचलले जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
एमसीएच्या कारभाराविरोधात वारंवार तक्रारी केल्यानंतर एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी आरोपांची वेळीच दखल घेत योग्य कारवाई करणे अपेक्षित होते. पंरतू, कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला होता, असे पाटील म्हणाले. विशेष म्हणजे पुण्यातील गव्हूंजे स्टेडियम समोरील जागेवर बेकायदेशीररित्या एमसीएने पार्किंग थाटली आहे. संबंधित जमीन सरकारची असतांना सर्रासपणे या जागेचा वापर अवैधरित्या केला जात आहे, हे देखील चर्चेदरम्यान पदाधिकार्यांच्या लक्षात आणून दिल्याचे पाटील म्हणाले. सर्व मागण्यांवर सादकबादक चर्चा करीत एमसीएने सकारात्मकता दर्शवत पुढील कारवाईचे आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले.