Home मनोरंजन झापुक झुपूक सिनेमातील ‘वाजीव दादा’ हे धमाकेदार हळदीच गाणं झालं रिलीज!!

झापुक झुपूक सिनेमातील ‘वाजीव दादा’ हे धमाकेदार हळदीच गाणं झालं रिलीज!!

20 second read
0
0
6

no images were found

झापुक झुपूक सिनेमातील ‘वाजीव दादा’ हे धमाकेदार हळदीच गाणं झालं रिलीज!!

 

अख्ख्या महाराष्ट्रात झापुक झुपूकचं वेड पसरलय. सर्वत्र सूरज चव्हाणच्या या आगामी सिनेमाची चर्चा आहे. अशातच आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं ‘वाजीव दादा’ प्रदर्शित झालंय. पहिल्या दोन गाण्यांना  मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर ‘झापुक झुपूक’ सिनेमातील हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे. मराठी हळदी गाण्याच्या शोधात असाल, तर हे गाणं तुमच्या लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये अवश्य जोडा! मस्तीने पुरेपूर आणि उत्साह ने भरपूर असलेलं असं हे लग्नसराईत जल्लोष आणतं. हळदीच्या तेजस्वी पिवळ्या रंगाप्रमाणेच हे मजेदार गाणं आहे जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि नक्कीच तुमचं वातावरण आनंद आणि उर्जेने भरून टाकेल.

     ‘वाजीव दादा’ हे गाणं सूरज चव्हाण सह त्याच्या बिग बॉस मधील जवळच्या कलाकारांवर आणि इतर सह कलाकारांवर जसे जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना, हेमंत फरांदे, जुई भागवत आणि पुरुषोत्तम पाटील ह्यांच्यावर चित्रित केलं गेलय. गाण्यात ह्या सर्वांचा कल्ला आणि एकमेकांसोबतची जुगलबंदी पहायला मिळत आहे. 

      वाजीव दादा’ ह्या गाण्याला गायक चंदन कांबळे आणि ज्ञानेश्वरी कांबळे ह्यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीतकार चंदन कांबळे हे आहेत. चंदन कांबळे हे मराठी संगीतविश्वातील एक लोकप्रिय गायक आहेत. त्यांची खास ओळख भक्तिगीते, लोकगीते आणि जिव्हाळ्याच्या सुरांनी भरलेल्या गाण्यांसाठी आहे. त्यांच्या भक्तिगीतांनी श्रोत्यांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. त्यांचे गायन शैली भावपूर्ण असून ग्रामीण रंग, श्रद्धा आणि साज या तिन्हींचा सुंदर संगम त्यांच्या गाण्यांमध्ये दिसतो आणि आता ते “झापुक झुपूक” च्या माध्यमातून पहिल्यांदा चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. त्यांचं ‘वाजीव दादा’ हे मराठमोळं गाणं प्रत्येकालाच थिरकायला लावणारं आहे. तेव्हा आता तुमची हळदी भारतीय पद्धतीने ‘वाजीव दादा’ च्या अंदाजात साजरी करूया! 

     विशेष म्हणजे ह्या गाण्याला मेटा ऑफिस मधून लाँच करण्यात आलं आणि यादरम्यान निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे उपस्थित होते. तर सूरज, पुष्कराज आणि त्याचे बिग बॉसच्या घरातील मित्र जान्हवी किल्लेकर, आणि छोटा पुढारी हे देखील उपस्थित होते. 

    “झापुक झुपूक” हा सिनेमा मनोरंजनाने भरपूर आहे. चित्रपटात सूरज सोबत इतर मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

     जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे !!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर विभागातील पंधरा बाजार समित्या

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर वि…