
no images were found
परंपरा आणि आकर्षकतेचे संयोजन: ओराचे गुढीपाडव्यासाठी नवीन उत्सवी ज्वेलरी कलेक्शन
गुढीपाडवा सण हिंदू नववर्ष शुभारंभाचे प्रतीक आहे, नवीन सुरूवात व समृद्धतेचा काळ आहे. हा सण जल्लोषात साजरा केला जातो, तसेच या सणाला शुभ भाग्याचे प्रतीक म्हणून खरेदी केली जाते. भारतातील आघाडीचा डायमंड ज्वेलरी ब्रँड ओरा ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. ट्रेण्ड्स कायम ठेवण्यासोबत ग्राहकांच्या मागण्यांची पूर्तता होण्याची खात्री घेण्यासाठी ब्रँडने गुढीपाडव्याकरिता आकर्षक डिझाइन्सचे अनावरण केले, ज्यामध्ये परंपरा आणि समकालीन आकर्षकतेचे उत्तमसंयोजन आहे.
यंदा सणासुदीच्याकाळात ओरा उत्सवी पेहरावांमध्ये अधिक आकर्षकतेची भर करण्यासाठी समकालीन डिझाइन्स सादर करत आहे. या नवीन उत्सवामध्ये लक्षवेधक हिरेजडित मंगळसूत्र आहे, जे पैठणी व नऊवारी साड्यांवर शोभून दिसण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहे. या मास्टरपीसला पूरक मॅचिंग इअररिंग्स, आकर्षक अंगठी आणि आकर्षक ब्रेसलेटचे संयोजन आहे. प्रत्येक पीस उत्सवी उत्साहामध्ये अधिक आनंदाची भर करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलाआहे. या नवीन फेस्टिव्ह डिझाइन्समध्ये कालातीत परंपरा आणि आधुनिक कलाकृतीचे परिपूर्ण संतुलन आहे.
ओरा फाइन ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपू मेहता म्हणाले, “गुढीपाडवा सण नववर्ष शुभारंभाचे आणि समृद्धताव आनंदाने भरलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. ओरामध्ये, आम्ही हिऱ्यांच्या दागिन्यांसह हा शुभ सण साजरा करतो, ज्यामधून भारतातील संपन्न सांस्कृतिक वारसा दिसून येतो, ज्यामध्ये पारंपारिक कलाकृती आणि आधुनिक आकर्षकतेचे संयोजन आहे. आम्ही ग्राहकांना ओराच्या आकर्षक ज्वेलरी डिझाइन्ससह या सणाचा आनंद घेण्याचे आणि प्रत्येक नवीन सुरूवात खऱ्या अर्थाने उत्साहपूर्ण करण्याचे आवाहन करतो.”
या फेस्टिव्ह कलेक्शनव्यतिरिक्त ओरा प्रत्येक प्रसंगासाठी आकर्षक दागिन्यांचा खजिना देखील देत आहे. जसे ‘एकता’ – द वेडिंग कलेक्शन, जे अंतर्गत नात्यांना साजरे करते; अॅस्ट्रा, जे आधुनिक काळातील महिलांच्या उत्साहाचे प्रतीक आहे आणि सोलिस – दैनंदिन परिधानासाठी खासश्रेणी. प्रत्येक कलेक्शनमधून कारागिरी व सर्वोत्तमतेप्रती ओराची समर्पितता दिसून येते, जे ग्राहकांच्या मागण्या व पसंतींची पूर्तता करतात.