Home राजकीय एकनाथ शिंदेंची मोठी खेळी!

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी!

0 second read
0
0
64

no images were found

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी!

मुंबईः काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतींसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला.
मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणितं बिघडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला ही जागा शिंदेंना द्यावी लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरु केली होती. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती. मात्र देवरांच्या प्रवेशाने गणितं बदलली आहेत. मराठी-अमराठी मतांचं समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचं दिसून येतंय.
नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने, यामागे राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे. ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार हे नक्की. त्यामुळे आधी निकाल येऊ देणं आणि मग देवरांना प्रवेश देणं; यामागे मुत्सुद्देगिरी असल्याचं बोललं जातंय.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…