Home शासकीय उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

13 second read
0
0
35

no images were found

उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

 

कोल्हापुर (प्रतिनिधी):-महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्या वितरण शाखा व पाणीपट्टी शाखेमार्फत शहरातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने तीन नळ कनेक्शनला विद्युत मोटर लावून अनधिकृतरित्या पाणी वापर करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे वसुली पथकाने तीन नळ कनेक्शन खंडीत करुन त्यांच्या तीन विद्युत मोटारी जप्त केली आहे. या भरारी पथकामार्फत आजखेर थकबाकीपोटी 582 कनेक्शन्स खंडीत करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई प्रशासक के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली, शाखा अभियंता मयुरी पटवेगार, अजीत मोहिते, नरेद्र प्रभावळकर, मधु कदम, संजय पाटील, अमर बागल यांनी केली आहे.  

         शहर पाणी पुरवठा विभागास वार्षिक 88 कोटीचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे. यापैकी आज अखेर रक्कम रु.48 कोटी 31 लाख 3 हजार 939 इतकी वसुल करण्यात आली आहे. थकीत रक्कम वसुलीसाठी 5 विशेष पथके स्थापन करण्यात आली असून दि.10 डिसेंबर 2024 पासुन आजअखेर रक्कम रुपये 5 कोटी 13 लाख 97 हजार 58 रुपये इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली आहे.

पाणी बिलावरील विलंब आकार सवलत योजनेअंतर्गत आजअखेर सुमारे 19 हजार 885 लोकांनी लाभ घेतला आहे. या सवलत योजनेअंतर्गत रु.1 कोटी 72 लाख 85 हजार 521 इतका विलंब आकार माफ करण्यात आला आहे. तसेच रु.46 लाख 39 हजार 947 इतका विलंब आकार व रु.8 कोटी 86 लाख 71 हजार 604 इतकी थकबाकी वसुल करण्यात आलेली आहे.

         तरी हि मोहीम येथुन पुढेही सुरु राहणार असून शहरातील नागरिकांनी आपली अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी. कोणीही नळाला अनधिकृत मोटारी नळाला जोडू नयेत. अन्यथा नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारख्या कारवाईचे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…