
no images were found
शाश्वत विकासाची हमी देणारा अर्थसंकल्प : राजेश क्षीरसागर
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.मा.श्री.अजितदादा पवार यांनी आज विधिमंडळात सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह गुंतवणूक व रोजगार निर्मितीला प्राधान्य देणारा आहे. महायुती शासन सुरु केलेल्या योजना बंद करत नाही हे लाडक्या बहिण योजनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याकरिता नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक त्यातून होणारी रोजगार निर्मिती युवाकौशल्याला बळकटी देणारी आहे. निर्यात प्रोत्साहन धोरण, नवीन औद्योगिक धोरण, वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी, बंगलुरु – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर, टेक्निकल टेक्सटाईल मिशन, अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा,
एसटीचे सीएनजी आणि एलएनजी रुपांतर याद्वारे राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे. एकंदरीत पाहता राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला महाराष्ट्र राज्याकडून शाश्वत विकासाची हमी देणारा असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.