Home सामाजिक भाजपा जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न

भाजपा जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न

8 second read
0
0
21

no images were found

भाजपा जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर (प्रतिनिधी ):-भाजपा जिल्हा कार्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते.

याप्रसंगी कोल्हापुरातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी बजावलेल्या वंदना बबलवाड, हर्षदा कदम, निलम धनवडे, पल्लवी कांबळे, सविता सत्तपा जोशी, साध्वी माने, समृद्धी मानेया महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि नवीन महिलांचे पक्षांमध्ये नोंदणी करून घेऊन त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. 

       योगतज्ञ योगशिक्षिका आसावरी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी सर्व महिलांना आरोग्यावर तसेच ध्यानधारणेवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी सौ रंजना शिर्के अलका देसाई रूपाली कुंभार प्रणवती पाटील रिमा पालकर

 अलका जावीर गीतांजली काटकर शिवानी पाटील अश्विनी वास्कर मनीषा कुलकर्णी यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Load More Related Articles

Check Also

नवा मराठी चित्रपट अमायरा चा पोस्टर प्रदर्शित !! 

नवा मराठी चित्रपट अमायरा चा पोस्टर प्रदर्शित !!    जेव्हा एखादा चित्रपट चांगला आ…