Home Uncategorized क्रॉम्‍प्‍टनकडून ‘टेकविथहार्ट’ इनोव्‍हेशन्‍स लाँच; स्‍मार्ट, ऊर्जा-कार्यक्षम सोल्‍यूशन्‍ससह दैनंदिन राहणीमान उत्‍साहवर्धक2

क्रॉम्‍प्‍टनकडून ‘टेकविथहार्ट’ इनोव्‍हेशन्‍स लाँच; स्‍मार्ट, ऊर्जा-कार्यक्षम सोल्‍यूशन्‍ससह दैनंदिन राहणीमान उत्‍साहवर्धक2

2 min read
0
0
11

no images were found

क्रॉम्‍प्‍टनकडून ‘टेकविथहार्ट’ इनोव्‍हेशन्‍स लाँच; स्‍मार्ट, ऊर्जा-कार्यक्षम सोल्‍यूशन्‍ससह दैनंदिन राहणीमान उत्‍साहवर्धक2

 ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि. या ग्राहक इलेक्ट्रिकल सोल्‍यूशन्‍समधील अग्रगण्‍य कंपनीने ऊर्जा कार्यक्षमता, कामगिरी आणि ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करणाऱ्या अत्‍याधुनिक इनोव्‍हेशन्‍ससह उद्योग परिवर्तनाला चालना देणे सुरू ठेवले आहे. आज, कंपनीने नवीन ब्रेकथ्रू ‘टेकविथहार्ट’ इनोव्‍हेशन्‍स लाँच केले, ज्‍यासह उत्‍पादन क्षमता वाढवणे, स्‍वदेशी उत्‍पादन नाविन्‍यतेला चालना देणे, आपल्‍या पुरवठा साखळीला सानुकूल करणे आणि तंत्रज्ञान-संचालित ग्राहक सोल्‍यूशन्‍स देणे याप्रती आपली कटिबद्धता अधिक प्रबळ केली आहे.

पंखे व निवासी पंप श्रेणींमधील बाजारपेठ अग्रणी क्रॉम्‍प्‍टन उच्‍च-कार्यक्षम उत्‍पादने लाँच करत आहे, तसेच आपल्‍या देशांतर्गत उत्‍पादन क्षमतांमध्‍ये मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील करत आहे. नवीन अत्‍याधुनिक उत्‍पादन सुविधा, वाढते ऑटोमेशन व कम्‍पोनण्‍ट सोर्सिंगसह कंपनी ग्राहक इलेक्ट्रिकल्‍स उत्‍पादनामधील भारताची आत्‍मनिर्भरता अधिक प्रबळ करत आहे. ‘टेकविथहार्ट’ ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी स्‍मार्ट, शाश्‍वत आणि उच्‍च-कार्यक्षम सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याप्रती क्रॉम्‍प्‍टनच्‍या मिशनला सादर करते. वीजेची बचत करण्‍यासोबत प्रबळ कार्यक्षमता देणाऱ्या पंख्‍यांपासून सतत व विश्‍वसनीय पाणीप्रवाह देणाऱ्या पंपांपर्यंत प्रत्‍येक उत्‍पादन ग्राहक अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी, ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्‍यासाठी आणि हरित भविष्‍याला पाठिंबा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रोमीत घोष म्‍हणाले, “क्रॉम्‍प्‍टनमध्‍ये आम्‍ही ग्राहक-केंद्रित इनोव्‍हेशनसह ग्राहक इलेक्ट्रिकल्‍सच्‍या भविष्‍याला आकार देत आहोत. आम्‍ही प्रगत सोल्‍यूशन्‍स सादर करत आहोत, जे विनासायासपणे तंत्रज्ञान, कार्यक्षमतेशी एकीकृत होतात आणि ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. आमचे नवीन इनोव्‍हेशन्‍स इंडक्‍शन व बीएलडीसी फॅन तंत्रज्ञानांमध्‍ये कार्यक्षमतेची भर करतात, ज्‍यामुळे टिकाऊपणा वाढतो आणि शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स मिळतात.”ते पुढे म्‍हणाले, “टेकविथहार्ट’ इनोव्‍हेशन्‍ससह आम्‍ही स्‍मार्टर, अधिक शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍यासाठी मर्यादांना दूर करत आहोत. आम्‍ही आमच्‍या उत्‍पादन क्षमता प्रबळ करत आहोत आणि नेक्‍स्‍ट-जनरेशन पंख्‍यांपासून सोलार-पॉवर्ड पंपांपर्यंत ऊर्जा-कार्यक्षम इनोव्‍हेशन्‍सना चालना देत आहोत. क्रॉम्‍प्‍टनमध्‍ये आम्‍ही तंत्रज्ञान वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे कार्यक्षमता वाढवते आणि दैनंदिन जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणते.” 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…