
no images were found
जोडप्यांना पैशाबद्दल चर्चा करण्यास प्रोत्साहित करून HDFC बँकेने व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला
व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्ताने HDFC बँक या देशातील खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने जोडप्यांना आर्थिक गोष्टींबाबत शिक्षित करण्यासाठी #FinanciallyEverAfter हे एक अनोखे अभियान सुरू केले आहे. हे अभियान जोडप्यांना दोघांनी मिळून आपले अर्थ-व्यवस्थापन करण्याची कल्पना देते, जो आजकालच्या नात्यांमधला एक महत्त्वाचा पण काहीसा दुर्लक्षित पैलू आहे.
हे अभियान जेन Z आणि तरुण मिलेनियल जोडप्यांना दोघांनी मिळून एकत्रितपणे आर्थिक बाबी हातळण्यासाठी ज्ञान आणि साधने देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न करते. या बँकेने या उद्देशासाठी समर्पित https://www.moneymadeeasy.org/ ही एक मायक्रोसाइट तयार केली आहे, ज्यामध्ये एक परस्परसंवादी ‘फायनॅनष्यली एव्हर आफ्टर’ क्विझ आहे, जे मजेदार आणि माहितीपूर्ण पद्धतीने जोडप्यांना त्यांच्यातील आर्थिक अनुरूपता जोखण्याची संधी देते. हे क्विझ आर्थिक निर्णयांच्या बाबतीतील त्यांची वृत्ती कशी आहे हे दर्शविते आणि कोणत्या बाबतीत त्यांच्यात सहमती आहे आणि कोणत्या बाबतीत मतभेद आहेत हे देखील उघड करते.
या वेबसाइटमध्ये काही माहितीपूर्ण व्हिडिओ आणि लेख देखील आहेत, जे एक जोडपे म्हणून आर्थिक व्यवस्थापन कसे करावे याचे व्यावहारिक मार्गदर्शन देतात. यामध्ये बँकेच्या फायनॅनष्यल जॉकी एफ. जे. मोनिशा यांनी संकल्पना समजावून दिल्या आहेत आणि अवघड आर्थिक संज्ञांचे अर्थ उलगडून दाखवले आहेत.