Home मनोरंजन बस इतना सा ख्वाब मध्ये छवी पांडेचा प्रवेश

बस इतना सा ख्वाब मध्ये छवी पांडेचा प्रवेश

0 second read
0
0
12

no images were found

बस इतना सा ख्वाब मध्ये छवी पांडेचा प्रवेश

झी टीव्हीवरील ‘बस इतना सा ख्वाब’ला त्याच्या प्रीमिअरपासून आकर्षक नाट्य, गुंतागुंतीचे नातेसंबंध आणि अनपेक्षित वळणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेने आता तमन्नाच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री छवी पांडेच्या प्रवेशाने कथेत एक नवीन रोमांचक आयाम जोडला आहे. “टिप टिप बरसा पानी” मधील तिची ग्लॅमरस एन्ट्री पाहण्यासारखी आहे!

तमन्ना ही एक अशी स्त्री आहे जी अल्फा पुरुषांकडे आकर्षित होते, आणि तिच्या मते त्यांच्या अहंकाराला धक्का देणे हे प्रेमातील पराकोटीची आकर्षक बाब आहे. नातेसंबंधांमध्ये समानतेची कल्पना ती नाकारते, आपल्या जोडीदाराची आंधळी भक्ती करून आणि त्याची खुशामत करते, त्याचा खोटा स्वाभिमान वाढवते. कॉलेजच्या दिवसांपासून शिखर (योगेंद्र विक्रम सिंग) सोबत चा तिचा इतिहास असल्याने, तमन्नाचे त्याच्यावरील प्रेम आता वेडात रूपांतरित झाले आहे. शिखर आणि अवनी (राजश्री ठाकूर) यांच्या आयुष्यात तिचे परत येणे त्यांच्या नात्यात व्यत्यय आणेल, ज्यामुळे जोडप्यात संभ्रम आणि अंतर निर्माण होईल.

छवी पांडे म्हणाली, “तमन्नाची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. ती खूप गुंतागुंतीची असून या भूमिकेला अनेक स्तर आहेत. तिच्या भूमिकेत डोकावून पाहणे आव्हानात्मक आहे. तमन्नाचे वेड, तिची कारस्थाने आणि प्रेमाबद्दलची तिची विकृत कल्पना हे तिला एक रोमांचक व्यक्तिरेखा बनवतात आणि मी सेटवर माझा वेळ पूर्णपणे एन्जॉय करत आहे. या कलाकारांमध्ये सामील होण्याचा आनंद खरंच छान आहे – माझ्या सह-कलाकारांसोबत निर्माण झालेले नाते अद्भुत आहे. ते पहिल्या दिवसापासूनच खूप स्वागतार्ह आणि पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे या मालिकेमध्ये स्थिरावणे मला सोपे झाले. शिखरसोबतची दृश्ये असोत किंवा अवनीसोबतचे तणाव, सेटवरील ऊर्जा विलक्षण राहिली आहे आणि अशा प्रतिभावान आणि समर्पित टीमचा भाग असल्याचा मला आनंद आहे.”

तमन्नाच्या प्रवेशामुळे शिखर आणि अवनीमध्ये तणाव निर्माण होत असताना, प्रेक्षक भावनांच्या मोठ्या लाटेवर स्वार होतील. अवनी गैरसमज दूर करून शिखरला परत मिळवू शकेल का? की तमन्नाच्या या खेळीमुळे या जोडप्यात दुरावा निर्माण होईल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…