no images were found
‘अंतर योग फाऊंडेशन’ तर्फे २६ आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईत ऐतिहासिक २४ तासांच्या भव्यदिव्य महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन,
आचार्य उपेंद्रजी यांच्या अतुल्य अशा मार्गदर्शनाखाली ‘अंतर योग फाऊंडेशन’ २६ आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईत ऐतिहासिक अशा महाशिवरात्रीचे आयोजन करत आहे. २४ तास चालणाऱ्या या अध्यात्मिक महोत्सवात तब्बल १ लाख भाविक सहभागी होणार आहेत. आरोग्य, प्रगती, भरभराट, ज्ञान, महिला सक्षमीकरण या विविध पैलूंभोवती या अनोख्या अशा सोहळ्याची भिस्त असेल. त्या मध्यमातून अर्थ, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील नेतृत्त्व उभे करण्यावर भर असेल आणि त्याचवेळी सक्षम नागरिक निर्माण व्हावेत, असेही या आयोजनाचे उद्दिष्ट असेल.
हे आयोजन मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे होत असून भारतभरातील अध्यात्मिक गुरु यात सहभागी होणार आहेत. त्याशिवाय आघाडीचे उद्योजक, विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्वे यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर तब्बल १ लाख भाविक या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार आहेत. या सोहळ्या विनामूल्य प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे होणार आहे. तसेच या भव्यदिव्य महाशिवरात्री उत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
दुर्मिळ व आधुनिक अशी शिवसाधना, शक्तिपात दीक्षा आणि अनोखी अशी ज्ञानधारणा सत्रे यांच्या माध्यमातून आचार्य उपेंद्रजी यांनी अगणित लोकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यांचे आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंध यांमधील ज्या विविध समस्या होत्या, त्या त्यांनी लीलया सोडवल्या आहेत. हेच फायदे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता हे भव्य असे आयोजन केले जात आहे.
पथदर्शी अशा या प्रयत्नाचा भाग म्हणून ‘अंतर योग फाऊंडेशन’ तब्बल ५००० भाविकांसाठी रक्ततपासणी शिबीरसुद्धा आयोजित करत आहे. आधी नोंदणी केलेल्या भाविकांची तपासणी याद्वारे होणार असून त्याद्वारे त्यांना शक्तिशाली अशा उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अभूतपूर्व असे हे आयोजन असून त्याद्वारे प्राचीन अध्यात्मिकता आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा असा संगम अभूतपूर्व अशा प्रमाणावर साधला जाणार आहे.
पितृ ऋण मुक्ती साधना’ या आगळ्या अशा साधनेतून कोटी कोटी पितरांच्या मुक्तीचा एक सोहळा यावेळी सादर होणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीमध्ये जो अडथला ठरतो, तो तत्काळ दूर करणारी ही साधना आहे. त्याचबरोबर या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवमंत्र आणि स्तोत्र यांचे पठण केले जाणार असून त्यात २५,००० भाविक सहभागी होणार आहेत. त्याद्वारे पवित्र ऊर्जा आणि आशीर्वाद या माध्यमातून प्राप्त होणार आहे. या पवित्र अशा सामुहिक पठणाच्या माध्यमातून नकारात्मकता नष्ट होते आणि संपूर्ण वातावरण दैवी सकारात्मकतेने भरले जाते. त्यातून एकूण शारीरिक कल्याण साधले जाते आणि शक्तिशाली असे कंप निर्माण होतात. मनःशांती प्राप्त होते आणि लक्ष अविचल राहते.
यासोबत ५ कोटी लोक गणेशमंत्र एकत्रितपणे पठण करणार आहेत. भारताच्या भविष्यासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्त्व निर्माण करण्यासाठी हा खास महत्त्वपूर्ण अध्यात्मिक उपक्रम हाती घेतला गेला आहे. या उपक्रमामध्ये २४-तासांच्या यज्ञाचाही समावेश आहे. हे सत्र तपस्वी ब्राह्मण आयोजित करणार आहेत आणि त्यातून मानवी जातीच्या एकत्रित कल्याण व भरभराटीसाठी दैवी आशीर्वाद मिळविण्याचे लक्ष्य आहे.
या भव्य आणि दिव्य अशा आयोजनाचा एक भाग आचार्य उपेंद्रजी दाखल करणार असून ते अथर्वशीर्ष शास्त्रावरील प्रभावी व अंतरदृष्टीसंबंधी समालोचन करणार आहेत. या अनोख्या अशा पुस्तकातून याआधी कधीही समोर आले नाही असे अध्यात्मिक सत्य समोर येते आणि त्यातून कालातीत ज्ञान आणि मानवतेवरील अतुल्य असे मार्गदर्शन प्राप्त होते. भावी भक्कम नेते आणि कणखर नागरिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने हे तयार केले गेले असून या उत्तम अशा कालाकृतीमधून ज्ञान समोर येते आणि त्यातून आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्याची आणि चांगले माणूस होण्याची एक प्रक्रीया निर्माण होते.
आचार्य उपेंद्रजी हे एक अध्यात्मिक गुरु असून त्यांचे शिष्य जगभर पसरलेले आहेत. ते म्हणतात, “महाशिवरात्री हे काही केवळ एक अध्यात्मिक आयोजन नाही तर आपल्या देशातील नितीमत्ता असलेल्या नागरिकांचे संरक्षण करणे, त्यांना सबळ करणे व त्यांची उन्नत्ती साधने यासाठी हा एक प्रयत्न आहे. हा उत्सव म्हणजे भारताचे भवितव्य पुन्हा एकदा लिहिण्याची ती एक संधी असून त्यातून सर्वांसाठी आरोग्य, भरभराट आणि अध्यात्मिक वृद्धी साध्य करायची आहे.”
या भव्य अशा उत्सवाच्या अयोजानाचा भाग म्हणून ‘अंतर योग फाऊंडेशन’ विशेष उर्जाभरी औषधे दाखल करणार असून त्यातून झटकन उपचार व कल्याण साधणे अपेक्षित आहे. या आयोजनामध्ये आयुर्वेदिक तज्ज्ञांबरोबर समूह चर्चा आयोजित केली जाणार आहे. त्यातून नाविन्यपूर्ण आरोग्य उपचार साध्य केले जावू शकतात. त्यातून देशपातळीवरील आरोग्यक्रांती साध्य केली जावू शकते.
त्याचबरोबर शिव तांडव कार्यक्रम आणि हृदयस्पर्शी असा अध्यात्मिक संगीत सोहळा सादर होणार असून त्यात अनेक नावाजलेले कलाकार सहभागी होणार आहेत. या संपूर्ण आयोजनात १ लाखांहूनही अधिक लोक सहभागी होणार आहेत. त्यांना अन्नदान आणि प्रसाद यांच्या माध्यमातून अध्यात्मिक उर्जाभरे अन्न दिले जाणार आहे. त्यातून हे आयोजन म्हणजे सर्वांसाठी समावेशक आणि समृद्ध करणारा अनुभव सिद्ध होणार आहे.
‘अंतर योग फाऊंडेशन’ समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांना या अतुलनीय अशा अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करत आहे. त्यातून आरोग्यपूर्ण, भरभराट झालेला आणि अध्यात्मिकदृष्ट्या संपन्न असा भारत निर्माण करण्याचे समर्पित उद्दिष्ट आहे.
या आयोजनाची माहिती :
● तारीख : २६ आणि २७ फेब्रुवारी २०२५ /सकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा.
● कालावधी : २४ तास
● स्थळ : बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई
● प्रवेश : विनामूल्य
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी, कृपया संपर्क: 91 98216 49948 / 91 9769216335