Home शासकीय ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी प्राधान्याने करा- जिल्हाधिकरी अमोल येडगे

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी प्राधान्याने करा- जिल्हाधिकरी अमोल येडगे

21 second read
0
0
10

no images were found

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी प्राधान्याने करा- जिल्हाधिकरी अमोल येडगे

 

 

 

 कोल्हापूर, : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा, सुविधा तसेच शासकीय लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी अॅग्रीस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ईसेवा केंद्रावर सुरू असून ॲग्रीस्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्राधान्याने हाती घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी ऑनलाईन झालेल्या बैठकीत दिले. यावेळी तालुकास्तरावरील सर्व तहसीलदार,  गट विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकार तसेच कृषी अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी करवीर हरिष धार्मिक, करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे, सहायक निबंधक श्री. धायगुडे उपस्थित होते.

         केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत अॅग्रीस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशामध्ये राबविणे बाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने शासन निर्णय पारित केला आहे. शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना संपूर्ण राज्यात नागरी सुविधा केंद्राची मदत घेऊन राबविण्यात येत आहे. शेतकरी ओळखपत्र बनविण्यासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे. या योजनेचा शेतकरी व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती, त्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती व शेतांचे जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच तयार करून सातत्याने अद्यायावत करणे हा उद्देश आहे. या योजनेमधून पीएम किसान योजनेचा लाभ देण्यास, शेतक-यांना शेतीपिकासाठी कर्ज मिळविण्यासाठी सुलभता, नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण सुलभता, किमान आधारभूत किंमतीवर शेतक-यांची नोंदणी करणे ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल, शेतक-यांना सेवा देणा-या यंत्रणांना कृषी सेवा उपलब्ध करून देण्यास सुलभता येईल, लाभ वितरीत करण्यामध्ये लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणची आवश्यकता भासणार नाही असे अनेक फायदे आहेत.

       या योजनेबाबत सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत गावोगावी जनजागृती व नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत. सर्व शेतका-यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवाहन केले आहे की, आपण नोंदणी कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपला फार्मर आयडी तयार करुन घ्यावा किंवा आपण आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जावून फार्मर आयडी तयार करुन घ्यावा. याबाबत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना संपर्क करावा.

 

     जिल्ह्यातील 11 लाख 50 हजार 104 शेतकऱ्यांची 1798 नागरी सुविधा केंद्रामध्ये नोंदणी होणार

 

शेतकऱ्यांनी आपल्या गावातील नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जावून शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुक्यांमध्ये 1238 गावांमध्ये 11 लाख 50 हजार 104 शेतकऱ्यांची नोंद आहे. या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक तयार करून देण्यासाठी 1798 नागरी सुविधा केंद्रांची मदत मिळणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात …