
no images were found
‘भाबीजी घर पर है’ने साजरी केले २५०० एपिसोड्स!
बॅनर एडिट २ अंतर्गत संजय व बीनाफर कोहली निर्मित एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’ने २५०० एपिसोड्स पूर्ण करत अद्भुत टप्पा गाठला आहे आणि लवकरच १० गौरवशाली वर्ष साजरी करणार आहे. २०१५ मध्ये सुरू झालेली ही विनोदी मालिका भारतीय टेलिव्हिजन इतिहासामधील सर्वात प्रख्यात मालिकांपैकी एक बनली आहे. दोन शेजारी जोडपे मिश्रा व तिवारी यांच्या विलक्षण व विनोदी कृत्यांना सादर करणारी ही मालिका विनोदी कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. या मालिकेमधील प्रमुख कलाकार आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा), रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी), शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी) यांनी सर्वोत्तम परफॉर्मन्स दिले आहेत, तसेच जवळपास दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या अविश्वसनीय टप्प्याला साजरे करण्यासाठी टीमने सेटवर केक कापला. यावेळी सर्व कलाकार व टीम उपस्थित होती. संपूर्ण वातावरण आनंद, जुन्या आठवणी आणि हृदयस्पर्शी भाषणांनी भरलेले होते, जेथे प्रत्येकाने त्यांच्या दशकभराच्या प्रवासाला उजाळा दिला. निर्माता बीनाफर कोहली मालिकेच्या यशामागील सहयोगात्मक प्रयत्नाला दाखवत म्हणाल्या, ”प्रेक्षकांचे प्रेम आणि आमचे कलाकार व टीमच्या समर्पिततेमुळे हा टप्पा शक्य झाला. २५०० एपिसोड्स पूर्ण करणे अभिमानास्पद क्षण आहे आणि आम्ही आगामी वर्षांमध्ये देखील प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर हास्य आणत राहण्यास उत्सुक आहोत. आम्हाला हे कथानक सांगण्याकरिता परिपूर्ण मंच देण्यासाठी, तसेच प्रत्येक पावलावर पाठिंबा देण्यासाठी आम्ही एण्ड टीव्हीचे मन:पूर्वक आभार मानतो.”
मालिकेच्या या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत विभुती नाराण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख म्हणाले, ”हा प्रवास असाधारण राहिला आहे. विभुतीची भूमिका साकारताना मला खूप आनंद मिळण्यासोबत लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर आनंद आणण्याची संधी देखील मिळाली आहे. त्याची विलक्षण मोहकता व खोडकरपणा अनेक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे आणि मी वर्षानुवर्षे प्रेम व पाठिंबा देण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच, आम्हाला हा अद्भुत मंच देण्यासठी आणि या अविश्वसनीय प्रवासादरम्यान पाठिंबा देण्यासाठी मी निर्माते व चॅनेलचे देखील आभार मानतो.” अनिता भाबीची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्तव आभार व्यक्त करत म्हणाल्या, ”अनिताची मोहकता व हुशारी मालिकेमध्ये अद्वितीय फ्लेवरची भर करते आणि प्रेक्षकांनी पात्रांवर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहून आनंद होत आहे. या टप्प्यामधून मालिकेच्या संपूर्ण टीमचे अविरत प्रयत्न आणि प्रेक्षकांचे अतूट प्रेम दिसून येते.” मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, ”२५०० एपिसोड्स पूर्ण करणे उत्साहवर्धक अनुभव आहे. तिवारीच्या भूमिकेने विलक्षणता व विनोदी स्थितींसह प्रत्येक घरामध्ये हास्याची भर केली आहे. मला भारतीय टेलिव्हिजनवरील या लोकप्रिय मालिकेचा भाग असण्याने सन्माननीय वाटते. आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि आम्हाला हा उल्लेखनीय टप्प्यापर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी चॅनेल, निर्माते व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.” अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”अंगूरीची भूमिका माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. तिची निरागसता आणि सिग्नचेर संवाद ‘सही पकडे है’ चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. आनंद पसरवणाऱ्या मालिकेचा भाग असणे धन्य आहे. मी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानते