
no images were found
शिवाजी विद्यापीठातर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ कोल्हापूर ( प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठातर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत येत्या सोमवारी (दि. ६) शिवाजी विद्यापीठात एक तासाचा सामूहिक वाचन उपक्रम आयोजित केला आहे. वाचकांनी या वेळी सोबत आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक घेऊन यावे आणि त्याचे एक तास वाचन करावे, अशी ही संकल्पना आहे. यामध्ये विद्यापीठाच्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले आहे.