
no images were found
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन इमारती होणार कार्यन्वीत
कोल्हापूर, : शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज व भव्य अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 250 खाटांच्या कॅन्सर हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम, 250 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम व 600 खाटांच्या सामान्य रूग्णालय इमारतीचे बांधकाम असे मिळून 567.85 कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले होते. या वैद्यकीय महाविद्यालयातील काम पुर्ण झालेल्या इमारती सोमवारी प्रत्यक्ष कार्यन्वीत होणार आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत या इमारतींमध्ये फीत कापून प्रवेश केला जाणार आहे. यामध्ये रु.21.67 कोटी इतक्या रकमेचे 150 क्षमता असलेले मुलींचे वसतीगृह इमारत (तळ मजला+5) एकुण क्षेत्रफ़ळ 4419.71 चौ.मी., रु.7.40 कोटी इतक्या रकमेचे शवविच्छेदन गृह इमारत ( तळ मजला +1) एकुण क्षेत्रफ़ळ 1499.14 चौ.मी. व रु.9.55 कोटी इतक्या रकमेचे व्याख्यान कक्ष व परीक्षा कक्ष इमारत ( तळ मजला +1) एकुण क्षेत्रफ़ळ 2137.27 चौ.मी. या इमारतींचा समावेश आहे.
शेंडा पार्क कोल्हापूर या परिसरामध्ये पूर्ण झालेल्या व प्रगतीमध्ये असलेल्या कामांची आढावा बैठक दिनांक 28 डिसेंबर रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी अधिष्ठाता कार्यालयामध्ये घेतली. या आढावा बैठकी मध्ये कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी शेंडा पार्क येथे प्रगतीमध्ये असलेल्या व पूर्ण झालेल्या इमारती व छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय येथील बांधकामाचा आढावा दिला. मागील काळामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच काळात शेंडा पार्कमध्ये विविध इमारतींचे बांधकाम करणे या कामासाठी शासनाने एकुण रु.185.32 कोटी इतक्या रकमेच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून सद्यस्थितीत सदरची कामे प्रगती मध्ये आहेत.
यात 125 आंतरवासिता व 125 निवासी डॉक्टर्स पुरुष यांचे करिता वसतीगृह इमारत बांधणे. तळ मजला अधीक 5 माळे असे एकुण क्षेत्रफ़ळ 8270.40 चौ.मी., 125 आंतरवासिता व 125 निवासी डॉक्टर्स महिला यांचे करिता वसतीगृह इमारत बांधणे. तळ मजला अधीक 5 माळे एकुण क्षेत्रफ़ळ 8270.40 चौ.मी., 150 क्षमता असलेले मुलींचे वसतीगृह इमारत तळ मजला अधीक 5 माळे एकुण क्षेत्रफ़ळ 4771.19 चौ.मी., 150 क्षमता असलेले मुलांचे वसतीगृह इमारत तळ मजला अधीक 6 माळे एकुण क्षेत्रफ़ळ 4419.71 चौ.मी., 150 क्षमता असलेले 150 परीचारीकांकरीता वसतीगृह व वार्षीक 100 क्षमतेचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र बांधणे. यात स्टिल्ट, बेसमेंट, तळ मजला व वरील 1 एक मजला एकुण क्षेत्रफ़ळ 7750.00 चौ.मी., फॉरेस्न्सीक (न्याय वैद्यकशास्त्र) विभागाची इमारत बांधणे. स्टिल्ट, तळ मजला व वरील 1 मजला एकुण क्षेत्रफ़ळ 2314.35 चौ.मी. व या संस्थेच्या आवारामध्ये बॅडमींटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्टचे बांधकाम करणे यांचा समावेश आहे.
शेंडा पार्क येथील महाविद्यालयातील २९ एकराचा सर्व परिसर पूर्ण क्षमतेने वापरण्यात येत आहे .त्याकरिता या परिसरामध्ये सर्व रस्ते हे काँक्रीटचे करण्यात आलेले आहेत व मुलांना अभ्यास करण्याकरिता चांगले वातावरण राहावे याकरिता लँडस्केपिंगची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामांमध्ये प्रशस्त भव्य गेट व वाहनतळ, ओपन एअर थेअटर, ओपन जीमचीही तरतूद आहे.