
no images were found
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या बोर्डचे उद्घाटन
कोल्हापूर, : अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या बोर्डचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे व जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय कोल्हापुर येथे करण्यात आले.
या कार्यकमास जैन बॉर्डींगचे अध्यक्ष सुरेश रोटे, जैन बोंर्डींगचे सचिव श्री. शेटे तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल गडकरी तसेच मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.