Home क्राईम बसच्या खिडकीतून डोकावल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

बसच्या खिडकीतून डोकावल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

0 second read
0
0
121

no images were found

बसच्या खिडकीतून डोकावल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत
औरंगाबाद : शाळेतून घरी निघालेल्या नववीच्या विद्यार्थ्याने बसच्या खिडकीतून डोकावताच लोखंडी खांब धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानासमोर घडली. हरीओम राधाकृष्ण पंडित (रा.बजाजनगर,वाळूज) असे मृत मुलाचे नाव आहे.

हरीओम हा सरस्वती भुवन शाळेत इयता नववीत शिकत होता. दुपारी शाळा सुटल्यावर तो जिल्हा परिषद मैदान येथून शहर स्मार्ट सिटीबस मध्ये बजाजनगरकडे घरी जाण्यासाठी बसला होता. दरम्यान बस मध्ये बसलेल्या हरिओमने खिडकीतून डोके बाहेर काढून बघत असतानाच बाहेरील भिंत व खंबाचा डोक्याला जबर धक्का बसला आणी हरिओम रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला. हरिओमला तातडीने उपस्थिताना शासकीय घाटी रुग्णालयात हलविले. मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…