
no images were found
महापालिकेच्या वतीने वीरमाता/वीर पिता/वीरपत्नी यांचा सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने रविवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये जवान निवृत्ती मरळे यांची सून उर्मिला मरळे, जवान लक्ष्मण रावराणे यांची सून स्मिता रावराणे, जवान जयसिंग भोसले यांची पत्नी श्रीमती कांचनदेवी भोसले, कॅप्टन शंकर वालकर यांची वहिनी सौ.माणिक वालकर, जवान सुनिल चिले यांचे भाऊ अनिल चिले, मेजर मच्छिंद्र देसाई यांची पत्नी श्रीमती सुनिता देसाई, जवान दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे या देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सेवा बजावित असताना शहीद झालेल्या स्टेशन ऑफिसर भगवान जाधव यांची पत्नी श्रीमती जाई जाधव, फायरमन श्रीकांत पाटील यांची पत्नी श्रीमती अंजनी पाटील, फायरमन दत्तात्रय खामकर यांचा भाऊ शिवाजी खामकर, फायरमन अशोक माने यांची बहिन भाग्यश्री डकरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विधी अधिकारी संदीप तायडे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, महिला व बालकल्याण अधिक्षक प्रिती घाटोळे, एलबीटी अधीक्षक विश्वास कांबळे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.