
no images were found
‘ साहस, वीरता आणि बलिदानातून बीएसएफने केल्या देशाच्या सिमा मजबूत आणि सुरक्षित
‘जोधपूर : देशातील 140 कोटी लोकांच्या मनात ‘अजय भारता’ बद्दल निर्माण केलेल्या विश्वासाचे संपूर्ण श्रेय हे छातीचा कोट करून देशाच्या सीमांवर उभ्या असलेल्या वीर सैनिकांना जाते.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या काही वर्षांत आंतरिक सुरक्षेपासून ते सीमा सुरक्षेपर्यंत मोठा बदल घडवून आणला आहे. संपूर्ण जग याचे साक्षीदार झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे केले.
राजस्थानातील जोधपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या 60व्या स्थापना दिन सोहळ्यात केंद्रिय गृहमंत्री शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या ६० वर्षांच्या कार्यकाळात सीमा सुरक्षा दलाने अतुल्य साहस, वीरता आणि बलिदानातून देशाच्या पहिल्या नियंत्रण रेषेची फक्त सुरक्षा यंत्रणाच मजबूत केली नाही, तर सीमा प्रश्नांशी लढताना नागरिकांची सुरक्षा देखील सक्षम केली आहे, असे नमूद करीत केंद्रिय गृहमंत्री शाह म्हणाले, 1 डिसेंबर 1965 पासून आजपर्यंत सीमा सुरक्षा दलाने देशाच्या पूर्व आणि पश्चिम सीमांच्या सुरक्षेसाठी अखंडपणे समर्पणातून सेवा दिली आहे. देशाच्या सिमा आणि देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षीत रहावा यासाठी प्रसंगी जवानांनी आपल्या प्राणांचीही आहुती दिली आहे. त्याबद्दल देश सैनिकांचे कायम ऋणी राहील.
केवळ 25 बटालियन्सपासून सुरू झालेली ही तुकडी आज 193 बटालियन्सपर्यंत पोहोचली आहे. ज्यामध्ये 2 लाख 70 हजार सैनिक आहेत. आज ही बटालियन जगातील सर्वात मोठी सीमा गार्डिंग फोर्स बनली आहे. यावर्षीही सीमा सुरक्षा दलाने बनावट चलनी नोटा, मद्य, दहशतवाद आणि डाव्या विचारसरणीच्या दहशतवादा विरोधात अनेक ऑपरेशन्सद्वारे आपला विक्रम सिद्ध केला आहे. देशाच्या पहिल्या नियंत्रण रेषेचे संरक्षण करीत असताना आजवर 1,992 जवनांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकी 1,330 सैनिकांना सर्वोच्च पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये 1 महावीर चक्र, 6 कीर्तिचक्र, 13 वीरचक्र, 13 शौर्यचक्र, 56 सेना पदके 1,241 पोलीस पदकांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशात अंत्योदयाचे उद्देष ठेवण्यात आले आहे. सीमावर्ती भागांमध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती, सीमेवरील गावांमध्ये कल्याणकारी योजनांची 100% अंमलबजावणी आणि देशाच्या सीमावर्ती गावांमध्ये रेल्वे, रस्ता, जलमार्ग आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने दळणवळणाची साधने पुरवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
कायदेशीर व्यापार आणि लोकांमधील संपर्क यंत्रणेला प्रोत्साहन दिले जात आहे. सुमारे 1,159 किलोमीटर सीमारेषेवर फ्लड लाइट्स, 573 सीमा पोस्ट्स आणि 579 निरीक्षण पोस्ट उभारण्याचे काम केले गेले आहे. यासोबतच, 685 ठिकाणी वीज, 575 ठिकाणी पाणी जोडणी आणि 570 ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आले आहेत.
‘अमृतकाळ’ सारख्या प्रकल्पांमधून दुर्गम भागांमध्ये 1,812 किलोमीटर लांबीच्या सीमा रस्त्यांची निर्मिती करून या रस्त्यांद्वारे गावांमध्ये दळणवळणाची साधने वाढवण्याचे काम केले जात आहे.
ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी ‘वायब्रंट व्हिलेज’ कार्यक्रमांतर्गत 4,800 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद ही मोदी सरकारचे सर्वात मोठे यश आहे. सीमावर्ती गावांमधल्या स्थलांतराच्या समस्येवर मात करण्यासाठी यातून लोकांसाठी संपर्क यंत्रणा, आरोग्य सुविधा, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधा प्रदान करण्यावर भर दिला जात आहे.
आयुष्मान सीएपीएफ कार्ड्सच्या माध्यमातून 41,21,443 सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. यातून आतापर्यंत 1,600 कोटी रुपयांच्या एकूण 14.83 लाख दाव्यांवर भरपाई अदा करण्यात आली आहे. याशिवाय, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची देशातील 29,890 हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस पद्धतीने आरोग्य सेवा पुरविली जात आहे.मोदी सरकारचे सक्षम नेतृत्व आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सुरक्षा दलाच्या कल्याणासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली जात आहेत.