Home धार्मिक कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – श्रीमती साधना पाटील 

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – श्रीमती साधना पाटील 

17 second read
0
0
16

no images were found

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – श्रीमती साधना पाटील 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिर हे कोल्हापूर शहराच्या सर्वात मोठ्या कपिलतीर्थ मंडई येथे वसलेले आहे परंतु या मंदिरा भोवती वर्षानुवर्षे टपऱ्या, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिका प्रशासनास वारंवार सूचना करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच या मंदिराचे महात्म्य श्री महालक्ष्मी मंदिराशी सलग्न असल्यामुळे यामंदिराची स्वच्छता, भोवताली असणारे अतिक्रमण, या मंदिराचे महात्म्य सांगणारे फलक ई. गोष्टींकडे महापालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

            याप्रसंगी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये म्हणाले, कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिराची जी दुरावस्था झाली आहे ती अतिशय दयनीय आहे तसेच भक्त लोकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी जो बाहेरील मार्ग आहे तो संपूर्णत: अतिक्रमनाच्या विळख्यात आहे. मंदिराच्या शिखरावर झाडे झुडपे वाढलेली आहेत मंदिराच्या भोवती असणारी गटर्स कधीच साफ केली जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून महापालिका प्रशासनाच्या वरील विषयाशी संबंधित विभागांना सूचना देऊन कडक कारवाई करावी असे नमूद केले. 

या निवेदनाला उत्तर देताना उपायुक्त श्रीमती साधना पाटील म्हणाल्या, येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कपिलतीर्थ मंडई येथे येऊन मंदिर व परिसर अतिक्रमण मुक्त करू असे अस्वस्थ केले. 

         यावेळी जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे, संग्राम जरग, विजय आगरवाल, प्राची कुलकर्णी, युवराज शिंदे, भारत भोसले, सचिन पोवार, अनिश पोतदार ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …