
no images were found
सोनी मराठी वाहिनी थेट सांगलीकरांच्या भेटीस
सांगली : सोनी मराठी वाहिनी नवनवीन मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. सोनी मराठी देखील मनोरंजनाचा डोस देण्यास कायम सज्ज असते. सोनी मराठी अतूट नाती विणण्यासाठी सज्ज असताना एका मागोमाग एक मालिका रसिक प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असते. टेलिव्हिजनवर ही सोनी मराठी वाहिनी जसे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते तसेच मनोरंजन आता मायबाप प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. ‘आनंदाचा नजराणा, मनोरंजनाचा खजिना’ या कार्यक्रमातून सोनी मराठी थेट तुमच्या शहरात भेटीला येणार आहे.
विविध मनोरंजनाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला या सोनी मराठीच्या व्हॅन वरून पाहता येणार आहे. येत्या सोमवारी आटपाडी, मंगळवारी खानापूर (विटा), बुधवारी जत , गुरुवारी मिरज, शुक्रवारी तासगाव, शनिवारी पलूस येथे सोनी मराठीची व्हॅन ‘आनंदाचा नजराणा, मनोरंजनाचा खजिना’ घेऊन सांगली शहरात येणार आहे. तर तुम्ही सगळेच सोनी मराठीच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेला नक्कीच भरभरून प्रतिसाद द्याल यांत शंका नाही.
आजवर सोनी मराठी वाहिनीने तुमचे कायमच मनोरंजन केले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘जिवाची होतिया काहिली’, ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’, ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’, ‘तुमची मुलगी काय करते?’, ‘सुंदर आमचे घर’, ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. टेलिव्हिजनवरून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवत आता सोनी मराठी वाहिनी थेट प्रेक्षकांना त्यांच्या शहरात येऊन भेट देणार आहे. त्यामुळे जवळून आणि प्रत्यक्षात वाहिनीचे हे मनोरंजन पाहणे नक्कीच रसिक प्रेक्षकांना रंजक ठरेल.