
no images were found
सादर करत आहेत जमाई नं. 1, जो अपने ही अंदाज में सबको सुधारेगा!
भारतीय घरांमध्ये जावई हा केवळ जावई नसतो तर अनेकदा त्याला अगदी राजेशाही पद्धतीने, प्रेमाने आणि आदराने वागवले जाते. पारंपारिक पद्धतीने एक जावई हा त्याच्या पत्नीच्या घरी आदर आणि सहनशक्तीने भेट देतो आणि कुटुंबाच्या चौकटीमध्ये स्वतःला सामावून घेतो. मात्र काय होईल जेव्हा एक जावई घरामध्ये आपल्या खास पद्धतीने गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करेल?
झी टीव्हीवरील जमाई नं. 1 मध्ये नील परांजपेची भूमिका अभिषेक मलिक साकारत असून हा एक असा जावई आहे जो तुम्ही आधी कधीच पाहिला नसेल. नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये जन्म आणि लहानाचा मोठा झालेला नील हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. अतिशय बळकट मूल्यांसह त्यांनी नीलला मोठे केले आहे पण आपली नियती स्वतःच निर्माण करण्याचे नीलचे स्वप्न आहे. देखणा, जुगाडू आणि अतिशय विनोदी असा हा नील परिस्थिती पारंपरिक आणि तरीही प्रभावी पद्धतीने हाताळतो.
नशीब नीलला सिमरन कौर साकारत असलेल्या रिद्धी चोटवानीच्या आयुष्यात घेऊन जाते. सिमरन एक यशस्वी व्यवसायिका असून तिने स्वतःला वेदनांपासून कायमच दूर ठेवले आहे आणि ती कुणावरही भरोसा करत नाही. आपल्या परिवाराच्या वायनरीची सीईओ म्हणून रिद्धी अतिशय हुशार आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असलेली अशी आहे पण तिची आई कांचन उर्फ पपिया सेनगुप्ता यांची त्यांच्या परिवारावर घट्ट पकड आहे. जेव्हा चोटवानी परिवारामध्ये नील घरजावई बनून येतो तेव्हा प्रत्येक आव्हानाला तो आपल्या विशेष पद्धतीने सामोरा जातो आणि गंभीर क्षणांनाही मजेदार बनवतो.
नील आणि कांचनचे संवाद यांच्यातून अक्षरशः फटाक्यांची आतिषबाजी होत असते. त्यांच्या संवादांमध्ये विनोद पुरेपुर भरलेला आहे. नीलचे खोडकरपणे नियम मोडणे असो किंवा आपले वर्चस्व गाजवण्याचा कांचनचा निर्धार असो, त्यांच्यातील तू तू मैं मैं मुळे परिवारातील सदस्य कायम सज्ज असतात आणि या नवीन पैलूला समजून घेण्याचा प्रयत्न रिद्धी करत असते.
अभिषेक मलिक म्हणाला, “जमाई नं. 1 या मालिकेचा भाग बनण्यासाठी मी उत्साहित आहे. मी या भूमिकेकडे आकर्षित झालो कारण नील हा अनपेक्षितपणे वागणारा आणि आयुष्य भरभरून जगणारा असा मुलगा आहे. तो या मालिकेत भरपूर ऊर्जा घेऊन येतो आणि त्याचा प्रवास प्रेक्षकांना दाखवायला मी उत्साहात आहे. ही मालिका मजेदार, गुंग करणारी आणि सरप्राइजेसनी भरलेली असणार आहे आणि मला आशा आहे की नीलची माझी भूमिका या मालिकेच्या शीर्षकाला न्याय देईल.“
सिमरन कौर म्हणाली, “जमाई नं. 1 चा हिस्सा बनताना मी अतिशय उत्साहात आहे. या मालिकेची संकल्पना अतिशय वेगळी आहे आणि रिद्धीची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. रिद्धी एक बळकट स्वतंत्र आणि निर्धार असलेली स्त्री आहे. रिद्धीचा हा विशेष प्रवास पडद्यावर आणण्यासाठी मी तयार आहे. नातेसंबंध आणि कौटुंबिक डायनामिक्स यांच्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची ही एक उत्तम संधी आहे आणि तिच्यासह प्रेक्षकांशी कनेक्ट व्हायला मी उत्सुक आहे.”
पपिया सेनगुप्ता म्हणाली, “जमाई नं. 1 मध्ये कांचनची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. ही एक जटिल व्यक्तिरेखा असून कुटुंब आणि परंपरांच्या बाबतीत तिला दृढ विश्वास आहे आणि तिची ऊर्जा या मालिकेमध्ये आणण्यासाठी मी उत्साहित आहे. ही भूमिका मला भावना आणि संघर्ष यांच्या विभिन्न छटा यांचा शोध घ्यायला देईल. आणि त्यासाठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या मालिकेची संकल्पना अतिशय सुंदर असून मला खात्री आहे की कांचनची व्यक्तिरेखा या कथेमध्ये आणखी सखोलपणा आणेल.”
‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स निर्मित जमाई नंबर वन ही केवळ जावयाबद्दल नव्हे तर परंपरांच्या चौकटीतून बाहेर पडण्याबद्दल, नातेसंबंधांची पुनर्व्याख्या करण्याबद्दल आणि विनोद व भावस्पर्शी पद्धतीने लोकांना जवळ आणण्याबद्दल आहे.