
no images were found
युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. हे वर्ष भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून, तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात तरून वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणे गरजेचे असून, देशसेवेसाठी आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या हेतूने युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल, अशा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने मैत्री दिनानिमित्त “राजेश युथ फेस्टिव्हल” चे मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो. याचे औचित्य साधून युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने, युवासेना कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर आणि युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाची भव्यता वाढविण्यात आली असून महाविद्यालयीन युवा वर्गास शिक्षणासोबतच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी आणि हक्काचे व्यासपीठ राजेश युथ फेस्टीव्हलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.
रविवार सांयकाळी राजेश युथ फेस्टिव्हलचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित हजारो युवक – युवतींना निर्व्यसनी होण्याकरिता शपथ श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. युवा वर्गानेही यास दाद देत निर्व्यसनी होण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, युवा वर्ग हा आपल्या देशातील लोकसंख्येचा एक महत्वाचा घटक आहे. युवकांची मोठी संख्या हि आपल्या देशाची शक्ती आहे. किंबहुना ते आपल्या देशाचे मोठे श्रम भांडवल आहे. याच्व्हां इचार करता युवा वर्गाने स्वत: देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये सामील होणे गरजेचे आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून युवा वर्गास शिक्षणासह रोजगाराच्या संधी देत आहे. या संधीचा फायदा युवा पिढीने घ्यावाच पण स्वकर्तृत्वातून देश हितासाठी आणि देश सेवेसाठी योगदान द्यावे. युवा पिढीचा सर्वांगिण विकास राष्ट्र उभारणी साठी महत्वाचे आहे. त्यामुळे निर्व्यसनी राहून आई- वडिलांची, देशाची सेवा करावी. यासह स्वकर्तृत्वातून देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी राजेश युथ फेस्टीव्हल अंतर्गत पार पडलेल्या फुटबॉल टर्फ स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, आर्ट स्पर्धा, फॅशन शो, डान्स स्पर्धांचे बक्षीस वितरण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी युवासेना कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर आणि युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
सांकृतिक कार्यक्रमामध्ये ध्रुव मोदी यांच्या रॉक बँड ग्रुपच्या कलाकारांनी केलेल्या विविध हिंदी मराठी गाण्यांच्या डान्सवर युवा वर्गाने जल्लोष केला. तर डीजे श्रेया, डीजे विकी, डीजे ऐश्वर्या यांच्या एकापेक्षा एक सर्सास सॉंग ट्रॅकनी उपस्थित युवा वर्गास थिरकायला लावले.
यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, युवा सेनेचे चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, नो मर्सि ग्रुपचे अजिंक्य पाटील, अक्षय पाटील, दिग्विजय साळोखे, रोहित मेळवंकी, यश काळे, राज अहमद सय्यद, धवल भोसले, सनथ कोळेकर, अभिषेक बागल, धनराज कणसे आदी उपस्थित होते.