
no images were found
आशा पारेख यांनी आठवण काढली स्वर्गीय शम्मी कपूरसोबतच्या त्यांच्या सोनेरी दिवसांची
झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ दर आठवड्याला कला, मनोरंजन आणि प्रेरणा यांच्या अचूक मिलाफासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक आठवड्याला जसजशी ही स्पर्धा कडवी होत आहे, तसतसे देशभरातील प्रेक्षक त्यांच्या स्क्रीन्सला खिळून राहत आहेत आणि अतिशय उत्कटपणे आपल्या आवडत्या स्पर्धकांना समर्थन देत आहेत. मेंटॉर सचिन-जिगर, सचेत परंपरा आणि गुरु रंधावा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या भावी गायकांनी स्वतःला निव्वळ गायकामधून कसलेल्या परफॉर्मर्समध्ये रुपांतरीत केले आहे. यांचे सांगीतिक कौशल्य मेंटॉर्स आणि प्रेक्षक अशा दोहोंना थक्क करत आहे. या उत्साहामध्ये भर टाकत या वीकेंडच्या खास भागामध्ये ख्यातनाम अभिनेत्री आशा पारेख या मंचाला भेट देणार आहेत.
‘सा रे ग म प’ च्या चित्रीकरणामध्ये एक असाही असाधारण क्षण पाहायला मिळाला जेव्हा स्पर्धक महर्षी सनत पंड्याने तेरी आँखो के सिवा आणि तुमने मुझे देखा होकर मेहरबान या टाइमलेस क्लासिक्सवर परफॉर्म करत बॉलीवुडला आदरांजली अर्पण केली. त्याच्या या परफॉर्मन्सने सगळेच आणि खासकरून ख्यातनाम अभिनेत्री आशा पारेखजी मंत्रमुग्ध झाल्या. त्या या भागामध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यातील सुंदर परफॉर्मन्सने सद्गदित होऊन आशाजी यांनी ‘तीसरी मंजिल’मधील त्यांचे सहकलाकार स्वर्गीय शम्मी कपूर यांच्या सोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
आपल्या आवडत्या सहकलाकाराबद्दल आशा पारेखजी म्हणाल्या, “खरंतर आवडता सहकलाकार निवडणे कठीण आहे पण शम्मीजींसोबत काम करण्याचा अनुभव कायमच खास होता. ते केवळ एका सह कलाकारापेक्षा अधिक काहीतरी होते, ते माझ्यासाठी माझा परिवार होते. मी त्यांना प्रेमाने ‘चाचू’ अशी हाक मारत असे. अर्थातच आमच्या या नात्यामुळे एकत्र काम करणे आमच्यासाठी खूपच सोपे झाले. त्यांची शैली वेगळी होती आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा गाण्याचे चित्रीकरण व्हायचे तेव्हा संगीत जणू त्याच्या अंगामध्ये संचारायचे की काय असेच वाटायचे. गाण्यांमधील आमच्या दृश्यांसाठी डान्स मास्टर नसायचे. आम्ही आमची गाणी स्वतःच कोरिओग्राफ करायचो. ते मला सांगायचे ‘तू हे कर’ आणि मग मी सांगायचे की ‘मी हे करीन’ आणि मग तशा आमच्या स्टेप्स सहज जुळून यायच्या. त्यांची ऊर्जा प्रचंड होती आणि त्यामुळे आमचे परफॉर्मन्सेस खरोखरच संस्मरणीय बनले.”
बॉलीवुडच्या सुवर्ण काळातील या गोष्टी ऐकून प्रेक्षक तर थक्कच झाले होते. हा भाग संगीत आणि सिनेमा यांचा संस्मरणीय सोहळा असणार आहे, जो तुम्ही चुकवूच शकत नाही. आगामी भागांमधील अविस्मरणीय परफॉर्मन्सेस तुम्हाला नक्कीच आवडतील.