
no images were found
“लोकशाहीच्या बळकटीला आणि काय हवं… कर्तव्याचे भान ठेवून मतदानाला जावं..”
कोल्हापूर : “लोकशाहीच्या बळकटीला आणि काय हवं… कर्तव्याचे भान ठेवून मतदानाला जावं..” या गीतामध्ये आपला सहभाग देत जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या गीताच्या चित्रफितीचे प्रसारण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.
या गीतामध्ये उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी, करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर.व्ही.कांबळे तसेच महानगरपालिकेच्या 30 हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.
या गीताच्या प्रसारण कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी, करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक) वसुंधरा कदम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या मतदान जनजागृती गीताचे लेखन व दिग्दर्शन प्रभाकर लोखंडे, छायाचित्रण किरण खटावकर यांनी तर स्मिता पर्वतकर, तबस्सूम आत्तार, राजेंद्र कोरे यांनी गायन केले आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत या गीताची निर्मिती,संकलन, ऑडिओ, व्हिडिओ एडिटिंग राजेंद्र कोरे यांनी केले आहे. मतदार जनजागृतीपर हे गीत https://youtu.be/wJUWf-sKJmc?feature=shared या लिंक वर पहावे.