no images were found
मतदार आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स… ‘सी -व्हिजिल ॲप’ आता मराठीमध्ये देखील उपलब्ध
भारत निवडणूक आयोगाने मतदार आणि उमेदवारांकरिता सी-व्हिजिल, सुविधा ॲप, ॲफिडेविट पोर्टल, व्होटर टर्नआऊट ॲप, व्होटर हेल्पलाइन ॲप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता सक्षम ॲप, केवायसी ॲप आणि 1950 क्रमांकाची हेल्पलाईन आदी आयटी ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून सुविधा दिल्या आहेत, त्यांची थोडक्यात माहिती…
सी-व्हिजिल (cVIGIL)
सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रे, श्राव्य, किंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ‘सी-व्हिजिल’ चा अर्थ ‘सतर्क नागरिक’ असा आहे. हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.
सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक. गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/
सुविधा ॲप 2.0
भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0′ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.
गुगल प्ले स्टोअरवर https://play.google.com/store/
ॲफिडेविट पोर्टल
‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाची संपूर्ण यादी पाहता येते. कोणताही नागरिक ‘ॲफिडेविट पोर्टल’चा उपयोग करून उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहू शकतो व डाउनलोड ही करू शकतो. नागरिकांच्या सुविधेसाठी नामांकन दाखल, स्वीकारले, नाकारले, मागे घेतले, उमेदवार स्पर्धेत आहे याची माहिती मिळते.
पोर्टलची लिंक : https://affidavit.eci.gov.in
*व्होटर टर्नआऊट ॲप*
व्होटर टर्नआऊट ॲप प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघासाठी अंदाजित मतदानाच्या टक्केवारीची दर दोन तासांनी माहिती देते. हे अॅप्लिकेशन फक्त विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय होते.
‘व्होटर टर्नआऊट’ ॲपमध्ये प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची अंदाजित मतदान टक्केवारी दाखवते.भारत निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरून ‘रिअल-टाइम’ डेटाचा उपयोग करण्यात येतो.निवडणूक प्रकार, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघानुसार यामध्ये मतदानाच्या टक्केवारीची माहिती मिळते.एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मतदानाचा अंदाज मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा असा पर्याय आहे
‘व्होटर ट्रर्नआऊट अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/
व्होटर हेल्पलाइन ॲप
मतदारांना आपले मतदार यादीत नाव आहे याची माहिती व्होटर हेल्पलाईन ॲप मध्ये मिळते. हे ॲप प्रत्येकासाठी अधिक सोयीस्कर आणि महत्त्वाचे आहेत. व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये मतदारयादीत नावाची शहानिशा करणे,नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, दुस-या मतदारसंघात स्थलांतरित करणे,परदेशात राहणारे मतदार, मतदारयादीतील नाव हटवणे किंवा आक्षेप घेणे,नोंदींची दुरुस्त करणे,तुमच्या क्षेत्रातील निवडणुकीचे वेळापत्रक शोधणे, सर्व उमेदवार त्यांचे प्रोफाइल, उत्पन्न विवरण, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे शोधणे, बीएलओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ यांची माहिती मिळवता येते व संपर्क साधता येतो
व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक :गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/
*सक्षम ॲप*
भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.
सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/
*केवायसी ॲप :- (know your Candidate)*
मतदारांना त्यांच्या उमेदवारांबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती इत्यादी पाहता येऊ शकते.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/
*1950 क्रमांकाची हेल्पलाइन*
निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.