Home शासकीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून एकूण प्राप्त 6 अर्जातील 5 जाहिरातींना प्रमाणपत्राचे वितरण

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून एकूण प्राप्त 6 अर्जातील 5 जाहिरातींना प्रमाणपत्राचे वितरण

2 second read
0
0
12

no images were found

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून एकूण प्राप्त 6 अर्जातील 5 जाहिरातींना प्रमाणपत्राचे वितरण

 

कोल्हापूर: चालू विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय जाहिरातीच्या ऑडिओ व व्ह‍िडीओवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे विशेष लक्ष असणार आहे. आजअखेर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाकडून एकूण प्राप्त 6 अर्जातील 5 निकाली असून 1 अर्जाची तपासणी सुरु आहे.

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून दृकश्राव्य स्वरूपातील पेड प्रमोशन च्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमावर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींना प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.

तसेच, माध्यम कक्षाकडून पेड व फेक न्यूज, द्वेष व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट बातम्यांवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या बातम्यांच्या पोस्ट सोशल मीडियातून प्रसिध्द होणार नाही याची खबरदारी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून घेण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…