Home शासकीय विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेसाठी नाव नोंदणी करा

विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेसाठी नाव नोंदणी करा

0 second read
0
0
74

no images were found

विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेसाठी नाव नोंदणी करा

 

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे इंडोकाउंट फाउंडेशन, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगाव यांच्या सीएसआर फंडातून अद्यावत अशी आंतराष्ट्रीय दर्जाची व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ही व्यायामशाळा खेळाडूंसाठी व नागरिकांसाठी दि.14 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. व्यायामशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. जे खेळाडू, नागरीक व्यायामशाळा प्रवेशासाठी दि. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत नाव नोंदणी करतील त्यांना पहिल्या महिन्यासाठी फी मध्ये 50 टक्के सवलत देऊन 500 रुपये इतकी फी आकारण्यात येईल, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी केले आहे.

यासाठी श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर समितीकडून प्रति महिना फी 1 हजार रुपये, 3 महिन्याची एकत्रित फी भरल्यास 2 हजार 500 रुपये, 6 महिन्याची एकत्रित फी भरल्यास 4 हजार 500 रुपये व 12 महिन्याची एकत्रित वार्षिक फी भरल्यास 7 हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे, असेही श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…