Home शासकीय जिल्ह्यात 28 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी

जिल्ह्यात 28 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी

1 second read
0
0
104

no images were found

जिल्ह्यात 28 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी

 

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलने करण्यात येतात. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्या पासून ते दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 24 वाजेपर्यंत मनाई केली आहे.

 हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य अधिकार बजाविण्या संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जाती धर्माचे सण / उत्सव / जयंती / यात्रा, इ. हे शांतता मय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…