no images were found
स्पर्धक रूपेश मिश्राला ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’साठी गाणे गाण्याची मिळाली सुवर्णसंधी
शो ‘सारेगमप’ सुरू झाल्यापासून अवघ्या चार आठवड्यांमध्ये उभारता सितारा रूपेश मिश्राला मोठा ब्रेकथ्रू मिळाला आहे. राजकुमार राव व तृप्ती दिमरी अभिनीत आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मधील ‘चुम्मा’ गाणे गाण्यासाठी तो पार्श्वगायक बनला आहे. शोमध्ये रूपेशचा प्रवास पाहिलेल्या प्रेक्षकांसाठी ही असाधारण संधी सरप्राइज नाही, जेथे त्याचे टॅलेंट, अथक मेहनत व पॅशनचे शोमधील प्रख्यात मेन्टोर्स सचिन आणि जिगर यांनी सतत कौतुक केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सचिन व जिगर यांनी रूपेशला नवीन गाण्यासाठी त्याचा आवाज देण्याची ही सुवर्णसंधी दिली, ज्यामुळे त्याचे टॅलेंट व समर्पिततेला बहुमान मिळाला आहे.
शो ‘सारेगमप’ भारतीय संगीतक्षेत्रातील अविश्वसनीय टॅलेंटसाठी मोठा मंच राहिला आहे आणि रूपेशच्या यशामधून या मंचाची भावी सिताऱ्यांना निपुण व सादर करण्याप्रती क्षमता दिसून येते. शोच्या आठ एपिसोड्समध्ये रूपेशने त्याच्या सर्वोत्तम परफॉर्मन्ससह प्रेक्षक व मेन्टोर्सचे लक्ष वेधून घेतले आहे, तसेच सिद्ध करून दाखवले आहे की, त्याच्यामध्ये बॉलिवुडमध्ये आपली छाप निर्माण करण्यासाठी गायन व मंचावर उत्तम परफॉर्मन्स सादर करण्याची क्षमता आहे.
रूपेशला ही संधी दिलेले सचिन व जिगर म्हणाले, ”रूपेशला इतरांपेक्षा वरचढ ठरवणारी बाब म्हणजे त्याच्या आवाजाचा अद्वितीय दर्जा. त्याचा आवाज या गाण्याचा ताल व भावनेशी परिपूर्णपणे जुळला आहे. हा क्षण इंडस्ट्रीमधील नवोदित गायकांसाठी संधीचे नवे दरवाजे खुले करणार आहे. आमच्यावर विश्वास दाखवलेल्या मेन्टोर्सचे मार्गदर्शन मिळाल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवान मानतो आणि आता आम्ही पात्र टॅलेंटच्या भावी पिढीला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. रूपेश योग्य वेळी योग्य ठिकाणी आला आहे, विशेषत: म्युझिक लेबल्स व निर्माते नवीन गायकांना सादर करण्यास अधिक उत्सुक आहेत.”
हा रूपेशसाठी मोठा क्षण आहे, पण तो फक्त स्पर्धक नाही तर प्रतिभावान सितारा देखील आहे. अधिक उत्साहवर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळणार असल्यामुळे शो ‘सारेगमप’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत राहिल!