Home सामाजिक श्रीराम फायनान्स ने “टू-व्हिलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचर” महाराष्ट्रात लॉन्च केले

श्रीराम फायनान्स ने “टू-व्हिलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचर” महाराष्ट्रात लॉन्च केले

30 second read
0
0
15

no images were found

श्रीराम फायनान्स ने टू-व्हिलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचर महाराष्ट्रात लॉन्च केले

 

कोल्हापूर श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने आज “टू-व्हीलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचर” योजनेचा शुभारंभ करत असल्याची  घोषणा केली. येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपल्या पसंतीची दुचाकी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी टू-व्हीलर कर्जासाठी हा एक नाविन्यपूर्ण आणि अशा प्रकारचा  पहिलाच वित्तपर्याय उपक्रमआहे.

श्री वाय. एस. चक्रवर्ती, एमडी आणि सीईओ, श्रीराम फायनान्स कंपनीच्या या नवीन उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले: “टू-व्हीलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो आणि या सणासुदीच्या हंगामात आपली स्वतःची दुचाकी खरेदी करु इच्छिणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. श्रीराम फायनान्स ही महाराष्ट्रात दुचाकीसाठीच्या सर्वात मोठ्या वित्तपुरवठादार कंपन्यांपैकी एक आहे आणि या उपक्रमामुळे महाराष्ट्रात आमचे स्थान आणखी बळकट होण्यास तसेच ते उंचावण्यास मदत होईल.”

श्री चक्रवर्ती पुढे म्हणाले, “ग्राहक सामान्यत: खरेदी करु इच्छित असलेल्या बाईकच्या बारीकसारीक माहितीसाठी तसेच निर्णयाबाबत आपला बराच वेळ खर्ची घालवतात. तथापि, ते बहुतांश वेळा वित्तपुरवठ्यासारख्या महत्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे वित्तपुरवठादार निवडताना त्यांच्यासमोर अनिश्चितता निर्माण होते. आपल्याला हव्या असलेल्या दुचाकीसाठी आपली कर्जपात्रता आपणच निश्चित करु शकतो, याबाबत अनेकांना माहितीच नसते. टू-व्हीलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचरच्या माध्यमातून ग्राहक स्वतःच्या कर्जाची पात्रता अगदी सहज तपासू शकतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पसंतीची दुचाकीचे मालक होण्याचा आत्मविश्वास मिळतो, त्याचबरोबर वित्तपुरवठा उपलब्ध आहे, ही खात्रीसुध्दा मिळते.”

टू-व्हीलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचर हे दूचाकी कर्जासाठी स्वतःची पात्रता निश्चित करणे, कर्जपात्र रक्कम, व्याजदर आणि कर्जाचा एकूण कालावधी आदी प्रकारची माहिती शोधण्यात ग्राहकांचा वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.

नवीन उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी श्रीराम फायनान्सची वेबसाईट अथवा श्रीराम वन अॅपला भेट देऊन तेथे स्वतःबद्दलची प्राथमिक माहिती त्याचबरोबर ते खरेदी करु इच्छित असलेल्या दुचाकीबाबत माहिती भरणे गरजेचे आहे. ही माहिती भरताच त्यांना क्षणात डाऊनपेमेंट रक्कम आणि कर्जपात्रतेसह कर्जाचा रक्कमेबद्दल इत्यंभुत माहिती प्राप्त होते. त्यानंतर ग्राहकांनी त्यांचे टू-व्हीलर लोन एलिजिबिलिटी व्हाउचरडाऊनलोड करून डीलरशिप केंद्रात असलेल्या श्रीराम फायनान्सच्या प्रतिनिधीला कर्ज अर्जाच्या मंजुरीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह हे व्हाउचर सादर करणे आवश्यक आहे. अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण होते. पुढील चोवीस तासात कर्ज वितरीत होते आणि ग्राहक त्यांच्या पसंतीची बाईक आनंदाने घरी घेणं जाऊ शकतात.

श्रीराम फायनान्स लिमिटेडने त्यांच्या लक्ष्यित ग्राहकांनपर्यंत टू-व्हीलर लोन एलिजिबिलिटी वोउचरची माहिती पोहोचवण्यासाठी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये या बारा राज्यांमध्ये व्यापक स्वरुपात डिजिटल आणि आणि ऑन-ग्राउंड मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला सोशल मीडियावरील इन्फुएन्सरच्या देखील पाठबळ देणयात आलेले आहे. कंपनीने या मोहिमेमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये हिरो, सुझूकी, टीव्हीएस, यामाहा आणि रॉयल एनफिल्ड यासारख्या ओईएमबरोबर भागीदारी करत एक्सचेंज लोन मेळावे देखील आयोजित केले जात आहेत. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…