no images were found
“वंशज’ मालिकेची सांगता होणार असल्याने प्रमुख कलाकारांनी केली कृतज्ञता व्यक्त
सोनी सबवरील वंशज २८सप्टेंबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. महाजन साम्राज्याच्या दोन लढाऊ वंशजांच्या भूमिकेत अंजली तत्रारी आणि माहिर पांधी यांनीमालिकेत वारसा विरुद्ध लिंग-आधारित वारसा या मूल्यावर प्रकाश टाकून प्रेक्षकांना आपलेसे केले. उत्कंठावर्धक वळण, बदल आणि आणखी एका व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याच्या प्रवेशासह मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. यामुळे ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. शेवटपर्यंत मालिकेचा प्रेक्षक वर्ग तसाच टिकून राहिला. या आठवड्यात ही मालिका संपणार आहे. योग्य वारस शोधण्यासाठी युविका (अंजली तत्रारी) आणि डीजे (माहिर पंधी) यांनी जोरदार लढत दिली.ही मालिका संपत असल्याने मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा करून देत कृतज्ञता व्यक्त केली. असे करताना सर्वच कलाकारहे भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.
युविकाची महाजची भूमिका साकारणारी अंजली तत्रारी म्हणाली,वंशज मालिका संपत असताना खूप भावनिक वाटत आहे. मालिकेतील सहकालाकारासोबत चांगले संबंध निर्माण झाले. सेटवरचा प्रत्येक क्षण हा एक धडा आणि आठवणींचा असतो. मालिका सोडल्यानंतर मला सहकलाकारासोबत घालवलेल्या क्षणांची खूप आठवण येईल. तसेच आम्ही कुटुंबाप्रमाणे वागलो. आम्ही एक टीम म्हणून काम केले. कलाकार आणि क्रू नेहमीच माझी काळजी घेत असायचे, विशेषत: जेव्हा मला माझे ठीक वाटायचे नाही. तसेच उंबरगाव आणि घरापासून आणि माझ्या आईपासून दूर राहणे कठीण होते, परंतु मालिकेतील सहकालाकारांनी मला घरच्याप्रमाणे प्रेम दिले. त्यामुळे मला कधीही एकटे वाटले नाही. रोज चाहते मला भेटायला सेटवर यायचे आणि मला त्यांच्याकडून सुंदर भेटवस्तूही मिळत असे.. गुडबाय म्हणणे कठीण असले तरी, आम्ही तयार केलेल्या सुंदर आठवणींमध्ये मला रमायला आवडते.आता नवीन मालिकेची मी वाट पाहत आहे.
दिग्विजय महाजन यांची भूमिका साकारणारा माहिर पांधी म्हणाला,,“दिग्विजय महाजनची भूमिका साकारणे हा केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून माझ्यात बदल घडवणारा अनुभव होता. कलाकार आणि क्रू सोबत मी तयार केलेले संबंध, आम्ही तयार केलेल्या आठवणी तसेच माझा मालिकेचा अनुभव खूप चांगला होता. चित्रीकरणाच्या वेळी आम्ही सर्व घरापासून दूर होतो. उंबरगावमध्ये आम्ही एकाच सोसायटीत राहायचो, एकाच जिममध्ये जायचो, त्यामुळे साहजिकच आमच्यामध्ये एक घट्ट नातं निर्माण झाले आहे. हा मैत्रीचा, शिकण्याचा आणि खूप प्रेमाचा प्रवास आहे. सेटवर घालवलेल्या प्रत्येक क्षणाची मी नेहमीच कदर करेन आणि डीजेची भूमिका जिवंत करण्याचीसंधी मिळाल्याबद्दल कृतज्ञ आहे. खलनायकाला एवढी प्रशंसा मिळणे दुर्मिळ असल्याने डीजेवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा मी खूप ऋणी आहे. हा प्रवास इतका खास बनवणाऱ्या प्रत्येकाचे आभार.”
भानूप्रताप महाजनची भूमिका साकारणारे पुनीत इस्सर म्हणाले,“वंशज’ मालिकेच्या माझ्या प्रवासात मी मागे वळून पाहत असताना, मला स्वतःमध्ये या भमिकेची माझ्यात प्रतिबिंब सापडलेले दिसते. ही फक्त मालिका नव्हती तर मानवी मूल्ये आणि कौटुंबिक कर्तव्याचा एक उल्लेखनीय शोध होता. हा प्रवास विलक्षण होता आणि जसजसे आम्ही पुढे जात आहोत, तसतसे मी माझ्यासोबत आठवणींचा खजिना सोबत घेऊन जात आहे. ज्यांनी हा अनुभव अविस्मरणीय बनवला त्या सर्वांबद्दल मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो.
गर्गी महजनची भूमिका साकारणारी परिणिता सेठ म्हणली,“ जेव्हा मी मालिकेत काम करणे बंद केले तेव्हा माझे हृदय कृतज्ञता आणि दुःखात आहे. मालिकेत काम करणे अविश्वसनीय प्रवास हसणे उत्साह आणि असंख्य अविस्मरणीय क्षणांनी भरलेले आहे. आम्ही सर्वांनी एकत्र घालवलेले क्षण मी जपून ठेवत आहे. मालिके काम करताना आम्ही अनेक छोटे विनोद करून खूप हासायचो. निरोप घेणे कधीही सोपे नसते, विशेषत: जेव्हा मी माझ्या अद्भुत सहकलाकारांचा, विशेषत: माझा ऑन-स्क्रीन मुलगा डीजे ज्याच्या उर्जेने आमच्या दृश्यांना खूप आनंद मिळाला. सदैव प्रेरणादायी पुनीत सर, ज्यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार; या आठवणी मी कायम माझ्यासोबत घेऊन जाईन.