Home सामाजिक अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

12 second read
0
0
9

no images were found

अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

कोल्हापूर,  : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील शौचालय व्यवस्था, पार्किंग सुविधा, अतिक्रमणे तसेच भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या विविध सुविधांची आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकाळी 9.30 ला संयुक्त पाहणी केली.

       यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंखे तसेच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोंढे आदी उपस्थित होते.

        या पाहणीदरम्यान राजाराम हायस्कूलजवळील पार्किंग जागेची पाहणी करून सदर पार्किंग सुविधा कायमस्वरूपी खुली ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पागा बिल्डिंग येथील सार्वजनिक शौचालय स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.विद्यापीठ हायस्कूलसमोरील परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
      महाद्वार रोड, ज्योतिबा रोड व मंदिरालगतच्या परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी दिले. तसेच मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना ये-जा करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मंदिरालगत असलेले फुलविक्रेत्यांचे स्टॉल हटविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
देवस्थान समितीने मंदिर परिसरात अधिक सुरक्षारक्षक नियुक्त करून महाद्वार रोड परिसर मोकळा व सुव्यवस्थित ठेवावा, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी यावेळी दिल्या.
           त्याचबरोबर मंदिर परिसरातील अतिक्रमणे 10 जून 2026 पूर्वी स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

जननी समृद्ध मातृत्व अभियान देशात दिशादर्शक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल: खासदार सुधाकर सिंग

जननी समृद्ध मातृत्व अभियान देशात दिशादर्शक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल: खासदार सुधाकर सिंग…