Home शासकीय राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल –  गिरीश महाजन

राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल –  गिरीश महाजन

35 second read
0
0
22

no images were found

राष्ट्रकुट पर्यटक निवासवेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल –  गिरीश महाजन

 

मुंबई: जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राष्ट्रकुट पर्यटक निवासवेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. आगामी काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असुन लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी आहे. या दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकुट पर्यटक निवासवेरुळचा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशीपर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलएमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले कीयुनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला आहे. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी मर्यादित असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी 4 हजार 13.23 चौमी एवढया जागेत अद्ययावत असे पर्यटक निवासाचे बांधकाम केले आहे. 20 खोल्या2 डॉरमेट्री1 उपहारगृह1 किचनस्वागतकक्ष इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. पर्यटक निवास बांधण्याकरिता 7 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. सर्व खोल्या या वातानुकुलित असुन भव्य असे  2 लोकनिवास महीला आणि पुरुषांसाठी तयार करण्यात आले आहेत. भांडारकक्षस्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृहस्वागतकक्षव्यवस्थापक कक्ष याचाही यामध्ये समावेश आहे.

             पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या कीराष्ट्रकुट पर्यटक निवासामुळे वेरुळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्तम दर्जाची सोय होणार आहे. येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही लेण्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी उपलब्ध होणार असून छत्रपती संभाजीनगर शहरापासुन वेरुळ जवळच असल्याने पर्यटक या ठिकाणी राहण्यास जास्त पसंती देतील.

            व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले कीपर्यटक निवासाच्या समोरच हेलीपॅड असून जवळच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्रही आहे. पर्यटक निवासामध्ये विविध सोयी असल्याने पर्यटकांना राहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसचे सदरचे पर्यटक निवास हे वेरुळ लेण्यांच्या अगदी समोरील बाजुस असल्याने पर्यटकांना निवासाच्या खोल्यांमधून आणि छतावरुन लेण्यांचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. राष्ट्रकूट पर्यटक निवासाचे व्यवस्थापन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे हे करीत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…