
no images were found
नौदलातून सेवा निवृत्त जवांनासाठी शनिवारी परीसंवाद मेळावा
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापुर येथे शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे नौदलातील अधिकारी व त्यांची टिम येणार आहे. जिल्ह्यातील नौदलातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, नौसेना सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. या परीसंवाद मेळाव्यासाठी जिल्ह्यातील नौदलातून (NAVY) सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.