
no images were found
शिवाजी विद्यापीठात हिंदी दिवस समापन उत्साहात
कोल्हापुरः भारतीय सिनेमा आणि माध्यमांनी हिंदीला जागतिक स्तरावर नेवून ठेवले आहे. हिंदी ही आता ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची भाषा बनली आहे. त्यामुळे हिंदीच्या विद्यार्थ्यांना अनुवाद क्षेत्रात रोजगारांच्या अनेक वाटा असल्याचे असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.
हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिवसनिमित्त दि. 23 सप्टेंबरपासून विद्यापीठातील अधिविभाग व विद्यापीठ सलंग्नित महाविद्यालयांसाठी विभिन्न स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचा बुधवारी समापन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिर्के बोलत होते. याप्रसंगी यूको बॅंकेचे विद्यानगर शाखेचे व्यवस्थापक विशाल गीते प्रमुख पाहुणे होते. त्यांनी हिंदीच्या प्रचार व प्रसारासाठी हिंदी विभागाचे कार्य उत्तम असल्याचे प्रशंसा केली. हिंदी दिवसाचे औचित्य साधत संशोधक विद्यार्थी सुभाष बामणे यांनी हिन्दी विभागास तीन पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात हिंदीच्या प्र. विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी उपक्रमांची माहिती दिली. समन्वय डॉ. संतोष कोळेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार डॉ. प्रकाश मुंज यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश खबाले, डॉ. सुषमा चौगले यांनी केले. यावेळी डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. गीता दोडमणी, प्रा. प्रकाश निकम, डॉ. भाग्यश्री पुजारी, प्रा. अनिल मकर, डॉ. सुवर्णा गावडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.