Home शासकीय हातकणंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन

हातकणंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन

2 second read
0
0
30

no images were found

हातकणंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेअंतर्गत हातकणंगले येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील गरजू उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हातकणंगले येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नार्वेकर यांनी केले आहे.

मेळाव्यास हातकणंगले तालुका व परिसरातील जवळपास 25 इंडस्ट्रीज व आस्थापना सहभागी होणार आहेत. त्यांच्यामार्फत मुलाखती घेवून जवळपास 150 ते 200 रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये 18 ते 35 वयोगटातील 12 वी उत्तीर्ण, पदविका, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार मिळवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी के…