no images were found
डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२४ विघ्नहर्ता अंतर्गत महिलासक्षमीकरणाचा जागर
इचलकरंजी(प्रतिनिधी) : डीकेटीईमध्ये नेहमीच समाजउपयोगी संशोधन करण्यास प्राधान्य दिले जाते याचाच भाग म्हणून डीकेटीईच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत महिला सक्षमिकरण या विषयावर अधारित सजावट व श्रीं ची मूर्ती साकरण्यात आली आहे जी समाजातील अधुनिक स्त्रीची शक्ती, कौशल्य आणि बहुप्रतिभांचे प्रतीक आहे. हा देखावा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून समाजातील महिलांची सन्माननीय भूमिका अधोरेखित करण्याचा आणि त्यांना अधिक सक्षमी बनवण्याचा संदेश देतो.
या वर्षीच्या गणेशोत्सामध्ये ही साकारलेली सहा हातांची देवी सजावाटीचे मुख्य आकर्षण ठरली आहे. या देवीच्या हतात लॅपटॉप, तलवार, दुधाची बाटली, न्यायाचे पारडे, पीएचडीची पदवी आणि चमचा असे विविध वस्तू दर्शविण्यात आले आहेत ज्याद्वारे आधुनिक महिलांचे अनेक क्षेत्रातील कार्य व जबाबदा-या दर्शवल्या आहेत. देवीचे हे रुप समाजातील स्त्रीची अनेक भूमिका प्रतिबींत करते ती एक आई आहे, शिक्षिका आहे, घराची कारभारणी आहे, तर एक प्रोफेशनल देखील आहे, स्त्री ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमठवत आहे आणि स्त्रीया हया दिव्यत्वाचे प्रतिक आहे असे या श्लोकांमधून महिलांच्या महत्वाचे वर्णन करण्यात आले आहे.
महिलांच्या बहुप्रतिभेचे सादरीकरण डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण या विषयावार हालता देखावा सादर केला आहे. या देखाव्यात अधुनिक स्त्रीया कशा प्रकारे आपला संसार सांभाळून विविध भूमिका बजावत आहेत याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे तसेच महिला संरक्षण क्षेत्रातील महिलांचा गौरव सजावटीसमोर उभारलेल्या सहा स्टँडीजवर विविध क्षेत्रात स्वसंरक्षणात निपुण असलेल्या महिलांची माहिती देण्यात आली आहे.
सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी डॉ ए.बी. सौंदत्तीकर, स्वानंद कुलकर्णी, रवी आवाडे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे व मागदर्शकांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस संस्थेचे डायरेक्टर प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचेसह सर्व विभागप्रमुख यांचे मागदर्शन लाभले तर विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक्षा पाटील, ध्रुव साखरे, स्वालिहा मेस्त्री, व्यंकटेश पाटील, वाहिद नदाफ, प्रेम मग्नेवर, श्रीधर कांबळे, पूर्वा पाटील, श्रुती पाटील, अथर्व जमखंडीकर यांनी सदर देखावा साकरण्यास परिश्रम घेतले.