
no images were found
छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या दरम्यान सामंजस्य करार
कोल्हापूर(प्रतिनिधी): आज दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि शिवाजी विद्यापीठ, यांच्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. कुलगुरु, प्रा.डॉ.डी. टी. शिर्के यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले, हा सामंजस्य करार समाजास आणि संशोधक विद्यार्थी वर्गाला rlsp महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या लक्ष्य गटाकडून हस्तलिखित आणि दस्तऐवज अभ्यासन्यास उपयुक्त ठरेल-
या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे उपकेंद्र कोल्हापूर तर्फे व्यवस्थापकीय संचालक. श्रीमती किरण कुलकर्णी, सारथी उपकेंद्र, कोल्हापूर येथील संशोधन अधिकारी श्रीमती. नयन गुरव, प्रकल्प अधिकारी, श्री. दिपक पाटील उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप इत्यादी उपस्थित होते.