no images were found
अर्थार्जनासह विधायक कार्यासाठीच समाज माध्यम डॉ. व्ही. एन. शिंदेः विद्यापीठात यूट्यूब संदर्भात कार्यशाळेचे उद्घाटन
कोल्हापूर (प्रतिनिधी): आयुष्यभर विद्यार्थी बनून तंत्रज्ञानाशी जूळवून घ्या. शिका, लक्षात ठेवा, आठवा व त्याचा वापर समाज माध्यमांसाठी करा आणि अर्थार्जनाचा स्रोत निर्माण करा. पण या माध्यमांच्या अंतिम वापर हा विधायक कार्यासाठी करावा. असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये पीएम उषा योजनेअंतर्गत वि.स. खांडेकर भाषा भवन येथे मंगळवारी ‘यूट्यूब चॅनल : निर्माण, उपयोग, रोजगार’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले.
पहिल्या सत्रात विषयतज्ज्ञ विष्णू वजार्डे यांनी कंटेंटच्या जगात शॉर्टकट चालत नाही. कंटेंटमध्ये जीव असला पाहिजे. यूट्यूबसाठी बनवलेला वीडियो परफेक्ट असल्या पाहिजेत. स्वत:चा चेहरा न दाखविता सुद्धा व्हिडियो बनविता येतो. यावेळी त्यांनी यूट्यूब चॅनल कसे निर्माण करावे, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. दूस-या सत्रात माध्यम तज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव यांनी यूट्यूबसाठी कंटेंट निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हटले की, यूट्यूब वीडियो बनविताना कंटेंट खूप महत्त्वाचा आहे. कारण डिजिटल मीडियामध्ये कंटेंट हा किंग असतो. तो ओरिजनल असला पाहिजे. तसेच अभ्यासपूर्वक बनविला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुषमा चौगुले यांनी केले. यावेळी कार्यशाळेचे संयोजक डॉ. अक्षय भोसले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. रमेश खबाले, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ सुवर्णा गावड़े, डॉ भाग्यश्री पुजारी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.