
no images were found
वि.स. खांडेकरांचे सामाजिक योगदान अमूल्य: डॉ. रणधीर शिंदे
कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या ४८ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालयात डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. शिंदे म्हणाले की, गेलेल्या अनेक पिढ्यांचे भरण पोषण वि. स. खांडेकराच्या साहित्यामुळे झालेले आहे. अनेक सामाजिक विषयांना न्याय देण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले त्यांच्या साहित्य प्रकारामध्ये सर्व प्रकारचे विपुल साहित्य लेखन आढळून येते. ते सामजिक उन्नतीसाठी प्रेरणादायक ठरले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील होते. ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने खांडेकर यांच्या स्मृती जपल्या आहेत, ही विशेष कौतुकाची बाब आहे. सर्व मराठी साहित्यप्रेमी विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा, असे ही आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, प्रमुख, विदेशी भाषा विभाग, डॉ. प्रभंजन माने, प्रमुख, इंग्रजी अधिविभाग, डॉ. आर. जी.बारवेकर, डॉ. ए. एम. सरोदे, डॉ. एम. एस. वासवाणी, डॉ. डी . आर. मचाले, डॉ उदयसिंह राजेयादव, नितीन गंगधर, ऐश्वर्या भुरटे, वैशाली महाडिक आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.